नगर : शिवसेना ठाकरेंच्या दारात..शिंदे सेना सुसाट! | पुढारी

नगर : शिवसेना ठाकरेंच्या दारात..शिंदे सेना सुसाट!

नगर :  पुढारी वृतसेवा : शिवसेना आणि शिंदे सेनेमध्ये जिल्ह्यात रस्सीखेच सुरू आहे. जिल्ह्यात शिंदे सेनेची मोर्चेबांधणी सुरू असून, पदाधिकारी नियुक्तीसाठी धडपड सुरू आहे.तर, शिंदे सेनेला शह देण्याकरिता शिवसेना पदाधिकार्‍यांनी थेट मातोश्री गाठली. शिवसैनिकांचे मनोबल उंचवण्यासाठी नगरला येण्याचे गळ प्रत्यक्ष भेटीत घातली. नगर शहरातील शिवसैनिक व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे जाऊन भेट घेतली. नगरची शिवसेना भक्कम असून लवकरच नगरमध्ये भव्य मेळावा घेऊन असेही शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

नगर शहर शिवसेना पदाधिकारी -शिवसैनिक, नगर तालुका शिवसैनिक-पदाधिकार्‍यांनी मुंबईत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरूडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, गणेश कवडे, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, युवा सेनेचे विक्रम राठोड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, प्रकाश कुलट आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शहर शिवसेनेच्या वतीने उद्धव ठकारे यांना नगरला मेळावा घेण्याचे निमंत्रण देण्यात आले. त्यावेळी ठाकरे म्हणाले, आता आपण चांद्यापासून बांधापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आहेे. त्यामुळे दसर्‍यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत. त्यावेळी नगरला निश्चित मेळावा घेऊ असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. नगरची शिवसेना खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असल्याचा विश्वास शिवसैनिकांनी दिला.

पायी येऊन नका : ठाकरे
नगर तालुक्यातील शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी पायी मुंबईला पायी जाणार आहेत. तशी परवानगी शिवसेना प्रमुखांनी द्यावी अशी मागणी करण्यात आली. मात्र, शिवसेना प्रमुख उद्धव ठकारे यांनी दसरा मेळाव्याला मोटारीने या पायी येऊन नका, अशा सूचना सैनिकांना केल्या. तर, अपघात जखमी झालेले शिवसैनिक प्रकाश कुलट यांची अस्थेवाईकपणे विचारपूस केली आणि वातावरण हालकफुल करून टाकले.

जामखेडचे माजी सरपंच कैलास माने यांच्यासह कार्यकर्त्यांनी आज शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. शिवेसना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांनी माने यांच्यावर जामखेड तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, संपर्कप्रमुख सचिन जाधव आदी उपस्थित होते. जामखेडच्या तालुका प्रमुखपदी प्रा. कैलास माने, उपप्रमुखपदी संतोष वाळुंजकर व सचिवपदी संजय मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. नूतन पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी विष्णुपंत ढाकणे, आशुतोष डहाळे, सचिन राऊत, भारत कांडेकर, मुकेश जोशी यांच्यासह जामखेड येथील शिवसैनिक उपस्थित होते. जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांची शिवसेना पुढे वाढवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत. त्यांनी ज्या उद्देशाने शिवसेनेची स्थापना केली. त्या उद्देशाला आम्ही कधीही कमी होऊ देणार नाही. असे मत जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी व्यक्त केले.

Back to top button