पुढारी ऑनलाइन डेस्क : Patanjali : मला आणि पतंजलीला बदनाम करण्यासाठी मोठे षडयंत्र रचण्यात आले. पतंजलीचं यश पाहून अनेक जणांना ईर्षा होत आहे. त्यामुळे अनेक माफियांकडून पतंजलीला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप रामदेव बाबा यांनी केला आहे.
Patanjali रामदेव बाबा यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पतंजली लवकरच त्यांचे आयपीओ लाँच करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी रामदेव बाबांनी त्यांच्यावर आणि पतंजली विषयी नकारात्मक प्रसार करणा-या अनेक गोष्टींवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी आपल्या विरोधात अनेक माफियांनी चक्रव्यूह रचल्याचे सांगितले.
Patanjali तसेच पतंजलीचे खाद्यान्ना बाबत पतंजलीचे रिसर्च सेंटर जगातील सर्वात मोठे रिसर्च सेंटर आहे. तसेच 500 पेक्षा अधिक शास्त्रज्ञ , असेही त्यांनी सांगितले. तसेच येत्या काळात पतंजलीचे लक्ष्य एक लाख कोटींच्या टर्नओव्हरचे आहे. यावेळी पतंजलीचे गाईचे तूपाची आर एन व्हॅल्यू का फेल झाली याबाबत बोलताना ते म्हणाले, की मुळात ज्या लॅबकडे ते पाठवण्यात आले होते ती लॅबच अनधिकृत होती. त्यामुळे पतंजलीचे आरएन व्ह्यॅल्यू कमी आले. तसेच पतंजलीचे तूप केवळ भारतातच नाही तर अन्य अनेक देशात निर्यात केले जाते, असेही त्यांनी सांगितले.
बाबा रामदेव यांनी यावेळी पतंजलीच्या अन्य प्रोडक्ट बाबतही स्पष्टीकरण दिले.
हे ही वाचा :