अकोला दुर्घटना 
Latest

अकोला : दोन मुलींसह आईचा धरणात बुडून मृत्यू

मोनिका क्षीरसागर

अकोला: पुढारी वृत्तसेवा
जिल्हयातील बार्शिटाकळी तालुक्यातील दगडपारवा धरणात बुडून दोन मुलींसह आईचा मृत्यू झाल्याची घटना आज ( २ ) रोजी उघडकीस आली. म्हैशीला पाण्यातून बाहेर काढताना एकमेकीला वाचवताना या तिघीही पाण्यात  बुडाल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत माय-लेकींची ओळख पटली असून, सरिता सुरेश घोगरे (आई), वैशाली सुरेश घोगरे आणि अंजली सुरेश घोगरे (मुली) अशी मृत तिघींची नावे आहेत.

या तिघी म्हशी शोधण्यासाठी गेल्या होत्या. म्हैशीला पाण्यातून बाहेर काढतानाच एकमेकीला वाचवताना तिघीही बुडाल्या. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी तिघींचाही मृतदेह पाण्याबाहेर काढला असून, शवविच्छेदनासाठी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेने दगडपारवा परिसरात शोकाकूल वातावरण पसरले आहे

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT