पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांमध्ये हाहाकार माजवलेल्या भुकंपाने तुर्कस्तान आज (दि. २०) पुन्हा एकदा हादरला आहे. सोमवारी (दि. २०) तुर्कस्तानच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.४ इतकी मोजली गेली आहे. लेबनॉन आणि इस्रायल या भागांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिक वेळेनुसार सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास १० सेकंद हे भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे किती नुकसान झाले याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
६ फेब्रुवारीच्या पहाटे तुर्कस्तानमध्ये भूकंप झाला. आग्नेय कहारनमारस भागात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. ७.८ रिश्टर स्केल इतकी तीव्रता या भूकंपाची होती. तुर्कस्तान आणि शेजारच्या सीरियामध्ये हे भूकंप झाले. अनेक इमारती ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याचे चित्र दिसून आले. या दुर्घटनेत मृतांचा आकडा ४६ हजारांच्या पुढे गेला आहे. तुर्कस्तान सरकारने कहारनमारस आणि हाताय वगळता सर्व राज्यांमधील बचाव कार्य थांबवले आहे. 'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत भारतातून तुर्कीला पाठवलेली एनडीआरएफची टीमही परत आली आहे.
हेही वाचा
.