sheezan khan  
Latest

Tunisha Sharma death : चौकशीवेळी ढसाढसा रडला शीझान, म्हणाला…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूप्रकरणात तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता शीझान खान न्यायालयीन कोठडीत आहे. आज तुनिषाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. (Tunisha Sharma death ) मुंबईतील जेजे रुग्णालयात अभिनेत्री तुनिषा शर्माचे शवविच्छेदन करण्यात आले होते. यानंतर तिचा मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला होता. सोमवारी २६ डिसेंबरला रात्री आई आणि काकांकडे तिचे पार्थिव सोपवण्यात आले. (Tunisha Sharma death)

तुनिषा केसमध्ये १७ लोकांचा जबाब नोंदवला

तुनिष शर्मा केसमध्ये पोलिसांनी आतापर्यंत १७ लोकांचा जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा म्हणजेच टीव्ही सेट 'अली बाबा' च्या मेकअप रूमचा व्हिडिओ केला आहे, येथे तुनिषाने जीवन संपवले. पोस्‍टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्‍टर्सनी अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण आत्महत्या म्हटले आहे. शवविच्छेदनाच्या प्रक्रियेचा व्हिडिओदेखील केला आहे.

पोलिसांच्या चौकशीत रडू लागला शीझान खान

तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात शीझानची वलिव पोलिस चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान, शीझान खान सातत्याने आपला जबाब बदलत आहे. दरम्यान, महिला अधिकाऱ्यासमोर तो रडू लागला. तुनिषा शर्माने शनिवारी दुपारी साडे तीन वाजता टीव्ही शोच्या सेटवरील मेकअप रूममध्ये आत्‍महत्‍या केली होती. मंगळवारी २७ रोजी मीरा रोड येथील स्मशानभूमीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्‍कार होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT