Tridha Choudhury 
Latest

Tridha Choudhury : ‘आश्रम ३’ ची बबिता निवांत सोफ्यावर झोपली अन्…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'आश्रम ३' या वेबसिरीजमधून आपल्या बोल्ड अभिनयाने आकर्षित करणारी बबिता म्हणजे, अभिनेत्री त्रिधा चौधरी ( Tridha Choudhury )  चर्चेत आली आहे. तर सध्या तिच्या हॉट फोटोंनी आणि व्हिडिओने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. 'आश्रम ३' वेबसिरीजमध्ये बोल्डनेसची सर्व मर्यादा ओलांडलेली अभिनेत्री त्रिधा चौधरीने नुकतेच तिच्या हॉट फोटो शेअर करून चाहत्यांना धक्का दिला आहे. या वेबसिरीज त्रिधाने बबिताची भूमिका साकारून बोल्डनेसचा तडका लावला. परंतु, या चित्रपटात बोल्डनेसमध्ये दिसणारी बबिता म्हणजे, त्रिधा चौधरी खऱ्या आयुष्यातही बिनधास्त आणि हॉट दिसतेय.

त्रिधा चौधरीने नुकतेच तिच्या इंन्टाग्रामवर फ्लोवर लॉग ड्रेसमध्ये दिसतेय. यावेळी ती निवांत एका सोफ्यावर झोपलेली आहे. यावेळी मोकळ्या केसांनी आणि लाईट मेकअपने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे. या पहिल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Romance is in the Rains', तर दुसऱ्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Are you my Knight in Shining Chivalry? ⭐️'. असे लिहिले आहे. यावरून सध्या सर्वत्र पावसाळ्याचे दिवस असून तिला पावसात भिजण्याचा मोह झाला आहे. यामुळेच तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये खरा रोमान्स पावसात भिजण्यात असल्याचा म्हटले आहे. या फोटोला आतापर्यत्न ७२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्रिधाने यावेळी किलर पोझ दिल्या आहेत.

याशिवाय गेल्या आठवड्यात त्रिधा चौधरीचा एका व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत त्रिधाने अभिमन्यू दासानी यांच्या 'निकम्मा' चित्रपटातील टायटल गाण्यावर धमाकेदार डान्स करून चाहत्यांना मंत्रमुग्ध केले होते. यावेळी त्रिधा चौधरी निळ्या रंगाचा क्रॉप शर्ट आणि पांढऱ्या रंगाची ट्राऊजर परिधान केली होती. व्हिडिओच्या कॅप्शमध्ये तिने 'To all the Nikammas !!! ⭐️'.असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला ९२ हजारांहून अदिक लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय त्रिधा अनेक हॉट आणि ग्लॅमरस फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT