Latest

लतादीदींच्या पन्हाळ्यातील बंगल्याचे पर्यटकांना कुतूहल

backup backup

पन्हाळा : पुढारी वृत्तसेवा लता मंगेशकर यांचे पन्हाळ्याशी अतूट नाते होते. येथे त्यांचा बंगला आहे. या बंगल्याचे पन्हाळावासीयांसह पर्यटकांना नेहमीच आकर्षण आणि कुतूहल आहे. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या बंगल्याची जागा लता मंगेशकर यांनी 1980 मध्ये घेतली. तिथे बंगला बांधला. दिवाळीत त्या या बंगल्यात राहायला यायच्या. पन्हाळ्यात आल्या की पन्हाळकरांना वेगळीच आपुलकी वाटायची. त्यांची झेड प्लस सुरक्षा, तैनात असलेले कमांडो हा चर्चेचा विषय असायचा.

दीदी पन्हाळगडावरील ठरावीक दुकानांतूनच दैनंदिन वस्तूंची खरेदी करायच्या. आपुलकीने या दुकानातूनच दैनंदिन जीवनावश्यक वस्तू बंगल्यात आणल्या जायच्या. 2001 मध्ये पन्हाळ्याचे नगराध्यक्ष विजय पाटील आणि तत्कालीन अपारंपरिक ऊर्जा मंत्री विनय कोरे यांनी बंगल्यात लतादीदींची भेट घेऊन पन्हाळा विकासाबाबत दीर्घ चर्चा केली होती. दीदींना पन्हाळा फार प्रिय होता. गेल्या दहा-बारा वर्षांपासून मात्र त्या बंगल्यात आल्या नाहीत. लतादीदींनी वारणानगरच्या वारणा बाल वाद्यवृंदला भेट दिली होती. वाद्यवृंदातील मुलांना भरभरून आशीर्वाद देत त्यांचे कौतुक केले होते.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT