पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य पश्चिम मधील लहान शहरे आणि मोठ्या शहरांमध्ये चक्रीवादळाच्या तडाख्यात २१ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींची संख्या १२ हून अधिक आहे. जखमींवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Tornadoes) या तुफानी वादळामूळे जिवीत आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. अनेक घरांचे छत जमिनदोस्त झाले आहेत.
माहितीनूसार, या चक्रिवादळाने घरे आणि व्यवसाय जमिनदोस्त झाले आहेत. झाडांचा रस्त्यावर खच पडला आहे. वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मृतांमध्ये टेनेसी काउंटीमधील अंदाजे सात, अरकान्सामधील विन या छोट्या शहरातील चार, सुलिव्हन, इंडियानामधील तीन आणि इलिनॉयमधील चार जणांचा समावेश आहे.
इंडियाना आपत्ती व्यवस्थापन संचालक जिम पार्टले यांनी शनिवारी (दि.१) सांगितले की, अमेरिकेत झालेल्या या चक्रिवादळामुळे सुलिवान काउंटीमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला. सुलिव्हनमध्ये चक्रीवादळामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि अनेक लोक बेपत्ता आहेत. लिटल रॉक परिसरात एकाचा मृत्यू झाला तर १२ हून अधिक जखमी झाले आहेत.
हेही वाचा