

पुढारी ऑनलाइन डेस्क : भारतीय रुपया Indian Rupee सध्या जगभरात व्यापारासाठी थेट चलन म्हणून स्वीकारला जात आहे. जवळपास 35 देशांनी थेट रुपयात व्यवहार करण्यासाठी मंजुरी दिली आहे. अर्थात या देशांसोबत व्यापार करताना आता डॉलरची गरज भासणार नाही. हे देश थेट रुपयात व्यवहार करू शकतात. यामध्ये रशिया, म्यानमार, बांग्लादेश आणि नेपाळ इत्यादी देशांचा समावेश आहे. यामध्ये आता मलेशियाचा देखील समावेश होणार आहे. मलेशियातही थेट रुपयामध्ये व्यवहार करता येणार आहे.
आतापर्यंत आंतरराष्ट्रीय व्यवहार करताना बाजारात डॉलरची मागणी सर्वाधिक आहे. मात्र, भारत आता हळूहळू डॉलरच्या निर्भरतेतून बाहेर पडत आहे. आतापर्यंत भारत हा आपल्या सर्व आयातीसाठी डॉलरमध्येच पेमेंट करत होता. यामुळे भारताचे अब्जावधी डॉलर खर्च होत होते. मात्र, आता रुपया आंतरराष्ट्रीय व्यवहारात मजबूत होत आहे. जगातील रशिया, नेपाळ, बांग्लादेश, म्यानमार, यांच्यासह 35 देशांमध्ये थेट रुपयात व्यापार होणार आहे. या यादीत मलेशियाचेही नाव आता जोडले जाणार आहे.
भारत आणि मलेशियामध्ये नेहमीच घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. दोन्ही देशांमध्ये वेळोवेळी उच्चस्तरीय शिखर परिषदही होत असते. ही दोन्ही राष्ट्रे आसियान गटात महत्त्वाची भूमिका बजावतात. Indian Rupee
व्यापाराच्या बाबतीतही दोन्ही देशांमध्ये खूप चांगले संबंध राहिले आहेत. भारत आणि मलेशिया यांच्यातील व्यापाराबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ही माहिती दोन्ही देशांमधील व्यापाराच्या चलनाशी संबंधित आहे. Indian Rupee परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की, दोन्ही देशांमधील व्यापार आता इतर चलनांव्यतिरिक्त रुपयातही होऊ शकतो.
हे ही वाचा :