डीजेच्या तालावर अश्लील हावभाव करीत नाचणाऱ्यांवर लोणावळा पोलिसांची कारवाई; 4 बारबालांसह 10 जण ताब्यात | पुढारी

डीजेच्या तालावर अश्लील हावभाव करीत नाचणाऱ्यांवर लोणावळा पोलिसांची कारवाई; 4 बारबालांसह 10 जण ताब्यात

लोणावळा : येथील कुरवंडे (ता. मावळ) याठिकाणी एका खाजगी बंगल्यात मोठ्या आवाजात डीजे लावून सोबत आणलेल्या बारबालांसह अश्लील हावभाव करीत नाचणाऱ्या दहा जणांवर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे. आपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये बंगला मालक, बंगला चालक व केअर टेकर यांनादेखील आरोपी करण्यात आले आहे. शनिवारी 1 एप्रिलच्या मध्यरात्री 1 वाजता सदरची कारवाई करण्यात आली.

लोणावळा उपविभागीय अधिकारी आय.पी.एस सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमीद्वारामार्फत बातमी मिळाली की, मौजे कुरवंडे ता. मावळ जि. पुणे गावाच्या हद्दीत शर्मा व्हिला या खाजगी बंगल्यात बरेच लोक सार्वजनिक शांततेचा भंग होईल, असे साऊंड सिस्टीम लावुन मोठमोठ्याने गाणी वाजवत अश्लिल हावभाव करीत बारबालांना नाच करायला लावत आहेत. सदर बातमी मिळाल्याने आयपीस सत्यसाई कार्तिक यांनी आपल्या पोलीस स्टाफ यांच्या मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला.

त्यावेळी सदर ठिकाणी शिवाजी रामचंद्र भोसले (वय 50 वर्षे, रा.पंढरपुर रोड, ता. सांगोला, जि. सोलापुर), अभिजीत मच्छिंद्र सोनलकर (वय 37 वर्षे, रा. वंदे मातरम चौक, सांगोला, जि. सोलापुर), धनाजी अर्जुन जगताप (वय 37 वर्षे, रा. कडलस नाका, ता. सांगोला, जि.सोलापुर), संतोष नामदेव शिंदे (वय 48 वर्षे, रा बलवडी, ता सांगोला, जि सोलापुर), प्रविण चंद्रमोहन पैलवान (वय 48 वर्षे, रा.वझराबाद पेठ, सांगोला, जि सोलापुर) आणि फिरोज जहांगीर तांबोळी (वय 45 वर्षे, रा.भवानी चौक, सांगोला, जि सोलापुर) या सहा जणांसह 4 महिला अश्लिल हावभाव करीत नाचत असल्याचे मिळून आल्या.

या प्रकरणी सर्वांना ताब्यात घेऊन लोणावळा शहर पोलीस स्टेशन विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वरील गुन्ह्यास सहाय्य करणारे बंगाला मालक श्रेयश शर्मा (रा. मुंबई) सदरचा बंगला भाड्याने घेऊन चालविणारे लक्ष्मण दाभाडे (रा. लोणावळा), बंगल्याचा केअर टेकर कैलास पवार (रा. खंडाळा, लोणावळा) आणि गुरु पाटील (रा. तुंगार्ली, लोणावळा) यांनाही आरोपी करण्यात आले आहे. ही कामगीरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक आणि त्यांच्या पथकातील पो.हवा. अंकुश नायकुडे, जयराज पाटणकर, म.पो.हवा. आशा कवठेकर, चा.पो.शि. अंकुश पवार, पो.शि.सुभाष शिंदे, मनोज मोरे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पो. नि. सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. जयराज पाटणकर हे करीत आहेत.

Back to top button