kalam 376 Movie  
Latest

kalam 376 Movie : महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा वेध घेणाऱ्या ‘कलम ३७६’ चं पोस्टर लाँच

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : हजारो वर्षांची संस्कृती सांगणाऱ्या देशात स्त्रियांवरील अत्याचार हा मोठाच सामाजिक प्रश्न आहे. त्यातही स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार, शोषणाचा प्रश्नाचा वेध घेणाऱ्या 'कलम ३७६' ( kalam 376 Movie ) या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर लाँच करण्यात आले आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

संबंधित बातम्या 

'ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला' अशी धडाकेबाज टॅगलाईन असलेल्या 'कलम ३७६' ( kalam 376 Movie ) या चित्रपटाची निर्मिती आशिष धोत्रे आणि समीर गोंजारी यांनी केली आहे. सचिन धोत्रे आणि रवींद्र माठाधिकारी यांनी चित्रपटाचं लेखन, तर एम. बी. अल्लीकट्टी यांनी छायांकन केलं आहे. चित्रपटाचं पोस्टर अतिशय लक्षवेधी आहे. फाईलवर ठेवलेलं पिस्तुल आणि मागे भिंतीवर सावरकरांचा फोटो, पोलिसाची पाटी दिसतेय. त्यामुळे चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

चित्रपटाविषयी दिग्दर्शक संतोष धोत्रे म्हणाले की, 'लैंगिक गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. गेल्या चार दशकांत इतर गुन्ह्यांच्या तुलनेत बलात्काराचे प्रमाण सर्वाधिक वाढले असून गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आपण मागे पडत आहोत. दोन वर्षांच्या मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत बलात्काराच्या बळी ठरत आहेत. अशा स्थितीत कोणतीही कठोर कारवाई करण्याऐवजी आपल्या चुका लपवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणारे नेहमीच नवनवीन सबबी शोधत असतात. महिलांवरील बलात्कार आणि विनयभंग असे अत्याचार कधी थांबणार? आपण फक्त मूक प्रेक्षक बनून आपली पाळी येण्याची वाट पाहणार आहोत का? मुलींवर अत्याचार पूर्वीही होत होते आणि आजही होत आहेत. ते थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर…? आजही आपल्या समाजात अत्याचार करणारे खुलेआम फिरतात आणि निष्पाप पीडित मुलीकडे वाईट आणि अपमानास्पद नजरेने पाहिले जाते. अशा परिस्थितीत मुलीला सुरक्षित वाटेल, ही आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. याच मुद्द्यांचा वेध चित्रपटात घेतला जाणार आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT