Latest

बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकावर मराठी फलक लावा; जिल्हाधिकार्‍यांना निर्देश

अमृता चौगुले

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : नव्याने उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती बस स्थानकावर मराठीतही फलक लिहिण्यात यावेत, अशा सूचना केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव आणि जिल्हाधिकार्‍यांना केल्या आहेत. म. ए. युवा समितीने केलेल्या मागणीची दखल घेत आयोगाने हे पत्र पाठवले आहे.

नव्याने उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती बस स्थानकाचे काही दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आले होते. बस स्थानकांवर मराठीला डावलल्याने उद्घाटनापूर्वीच म. ए. युवा समितीने बेळगावच्या परिवहनच्या मुख्य नियंत्रकांना भेटून निवेदन देत मराठीची भाषेत फलक लावण्याची मागणी केली होती, पण परिवहन विभागाने मराठीला डावलून बस स्थानकाचे उद्घाटन केले.

निवेदन देऊनसुद्धा मराठी भाषेला डावलण्यात आल्याने परिवहन विभागाच्या विरोधात म. ए. युवा समितीने केंद्रीय अल्पसंख्याक आयोग, केंद्रीय मंत्री तसेच केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने घेतली आहे आणि बस स्थानकावरील फलक, बस फलाटावर आणि बसेसवर मराठीमध्ये लावण्यासाठी अल्पसंख्याक आयोगाने कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिवांना, अल्पसंख्याक कल्याण विभागाच्या सचिवांना आणि बेळगावच्या जिल्हाधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत.

केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे सहाय्यक आयुक्त शिवकुमार यांनी कर्नाटकाच्या अधिकार्‍यांना निर्देश देताना कायद्याचा दाखला देत ज्या भागात 15 टक्क्यांहून अधिक इतर भाषिक राहतात त्यांना त्यांच्या भाषेत सर्व कागदपत्रे, दिशाफलक, माहिती दिली पाहिजेत तसेच कर्नाटक राज्य भाषा अधिनियम 1981 आणि 2014 साली कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची त्यांना आठवण करून दिली आहे. युवा समितीने केलेल्या तक्रारीवर कार्यवाही करून अल्पसंख्याक आयोगाकडे माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT