चहामुळे होतो अनेक आजारांपासून बचाव www.pudharinews 
Latest

चहामुळे होतो अनेक आजारांपासून बचाव

backup backup

वॉशिंग्टन : पृथ्वीवरील प्रत्येक भागात 'चहा' हे पेय लोकप्रिय आहे. ठिकाण आणि हवामानाच्या हिशेबाने चहा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. चहा हा शरीराला तरतरीपणा देण्याबरोबरच अनेक लाभही मिळवून देतो. तसेच चहामध्ये असलेल्या औषधीय गुणांमुळे चीन व जपानमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन केले जाते. बहुतेक लोक रोजची सवय म्हणून चहा पितात. मात्र, ते चहामधील औषधीय गुणधर्माबद्दल अनभिज्ञ असतात.

चहासंदर्भात नुकतेच एक नवे आणि सविस्तरपणे संशोधन करण्यात आले. या संशोधनातील निष्कर्षानुसार चहामधील पदार्थांमध्ये 'पॉलिफेनोल्स' हे घटक आढळून येते. त्याचा शरीराला अनेक प्रकारे लाभ मिळतो. याशिवाय चहात असणारे कॅटेचिन, थियाफ्लेविन्स आणि थेरूबिगिन्स यासारख्या घटकांमध्ये अनेक प्रकारचे अँटी-इन्फ्लेमेंटरी, कॅन्सरविरोधी व कार्डियोप्रोटेक्टिव्ह गुण असतात.

जे शरीराला अनेक प्रकारे लाभ मिळवून देतात. या नव्या संशोधनात करण्यात आलेल्या दाव्यानुसार चहामुळे कॅन्सर आणि हृदयासंबंधीच्या समस्यांशी लढण्यास मदत मिळते. याशिवाय डिमेन्शियाचा धोका कमी करण्यास मदत मिळते. चहाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आढळून येते. यामुळे रक्तामधून हानीकारक अणू बाहेर टाकून सूज कमी करण्यास मदत मिळते. संशोधक डॉ. टेलर वॉलेस यांच्या मते, चहा हे असे पेय आहे की, जे सहजपणे लोक पिऊ शकतात. तसेच जर त्याचे नियमितपणे सेवन केल्यास संबंधिताला आरोग्यदायी व दिर्घायुष्य मिळण्यास मदत मिळते.

हेही वाचलंक का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT