निपाणी : भरदिवसा 50 हजार रोखडसह 3 तोळे चोरटयांनी केले लंपास | पुढारी

निपाणी : भरदिवसा 50 हजार रोखडसह 3 तोळे चोरटयांनी केले लंपास

निपाणी, पुढारी वृत्तसेवा : दौलतनगर येथे माजी सैनिक मनोहर प्रभुलिंग स्वामी यांच्या घरी चोरट्यांनी 3 तोळे सोने व 50 हजाराची रोखड असा एकूण सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेबाबत बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, माजी सैनिक स्वामी यांचे मूळ गाव कडगाव ता. (गडहिंग्लज) असून त्यानी सेवानिवृत्तीनंतर फेब्रुवारीमध्ये दौलतनगर येथे घर बांधले होते. शनिवारी सायंकाळी ते आपली पत्नी विजयमाला यांच्या माहेरी गेले होते.
रविवारी सायंकाळी ते आपल्या घरी परत आल्यानंतर पाहिले असता तिजोरी फोडून 3 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 50 हजार असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल लंपास केल्‍याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्‍यांनी बसवेश्वर चौक पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली.

विशेष म्हणजे निपाणी शहर व उपनगरात गेल्या तीन महिन्यांमध्ये आतापर्यंत 35 घरफोड्या झाल्या आहेत. यामध्ये केवळ एकाच घरफोडीचा तपास लावण्यात पोलीस प्रशासनाला यश आल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

Back to top button