Latest

Sushmita Lalit Modi Dating : सुश्मिताने सोडले मौन; डेटिंग प्रकरणावर फोटोतून केले भाष्य

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sushmita Lalit Modi Dating : गेल्या काही दिवसांपासून सुश्मिता सेन चांगलीच चर्चेत आहे ते तिच्या लव लाईफमुळे! सुश्मिता सध्या व्यावसायिक ललित मोदी यांना डेट करत आहे, अशी मोठी चर्चा रंगली आहे. त्यातच ललित मोदींनी स्वतःच मालदीवमधील आपले सुश्मिता सोबतचे रोमँटिक फोटो शेअर करून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर यावर ढीगभर मीम्स आले होते. अनेकांनी त्यांच्या रिलेशनशीपबाबत खिल्ली देखील उडवली होती. मात्र या सर्व घटनाक्रमावर सुश्मिताने मात्र मौन बाळगले होते त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. पण आता सुश्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन नवीन फोटो शेअर करून या सर्व प्रकणावर काहीच न बोलता खूप काही भाष्य केले आहे.

चला तर पाहुया नेमके सुश्मिताने कोणते फोटो शेअर केले आहे आणि काय म्हणाली ती आपल्या इन्स्टा अकाउंटवर…
सुश्मिता एका व्हाइट नेट गाऊनवर समुद्राकडे तोंडकरून पाठमोरी उभी आहे. तिचा हा लुक खूपच चार्मिंग आणि बोलका वाटत आहे. तसेच आपल्या आयुष्यात आलेल्या या वादळाला कसे शांत करावे अशा विचारमग्न अवस्थेत सुश्मिता या फोटोमध्ये दिसत आहे.
या फोटो शेअर करताना ती म्हणाली की, किती शांती आहे इथे आणि आरडाओरडा संपल्याचे पॉवर किती छान आहे. तिने या फोटोसाठी आपल्या मुलीला क्रेडिट दिले आहेत.

ललित मोदीसोबत डेटिंग आणि लग्नाला घेऊन वायरल बातम्यांवर तिने पहिली प्रतिक्रिया आपल्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करून दिले आहेत. सुश्मिताने आपल्या दोन्ही मुलींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या मुलींसोबत खूप आनंदी दिसत आहे. फोटोसोबत तिने लिहिले आहे, मी इथे खूप आनंदी ठिकाणावर आहे…ना मी लग्न केले ना माझा साखरपूडा झाला आहे. मी त्या लोकांसोबत आहे जे माझ्यावर कोणत्याही अटींशिवाय प्रेम करतात. मी लोकांना खूप स्पष्टीकरण दिले आहे पण आता बस! आता आयुष्यात आणि कामावर मी वापसी करत आहे. माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी धन्यवाद आणि जे माझ्या आनंदात सहभागी नाही मला त्यांच्यामुळे फरक पडत नाही. आय लव यू मित्रांनो! सुश्मिताची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT