रोहमन आणि ललित यांना एकाचवेळी डेट? | पुढारी

रोहमन आणि ललित यांना एकाचवेळी डेट?

पुढारी ऑनलाईन : माजी ‘मिस युनिव्हर्स’ आणि अभिनेत्री सुश्मिता सेन तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेक वेळा चर्चेत असते. वयाच्या 19 व्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स’ झालेल्या सुश्मिता सेनचे अनेक बॉयफ्रेंड झाले आहेत. अलीकडेच तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलशी ब—ेकअप झाला आहे. दोघे अडीच वर्षे रिलेशनशीपमध्ये होते.

सध्या सुश्मिता ललित मोदी यांच्यामुळे चर्चेत आहे. मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी एक ट्विट करीत आपण सुश्मिताला डेट करीत असल्याचे जाहीर केले होते. विशेष म्हणजे या दोघांचा परिचय गेल्या बारा वर्षांपासूनचा आहे. 2010 मध्येच सुश्मिता आणि ललित मोदी यांच्या नात्याबाबत चर्चा रंगल्या होत्या.

आता ललित यांनी सुश्मिताबरोबर असलेल्या नात्याची जाहीर कबुली दिल्यानंतर ललित-रोहमनला ती एकाचवेळी डेट करीत होती का? अशा चर्चा रंगल्या आहेत. ललित यांची पत्नी मीनल यांच्याशीही सुश्मिताची चांगली मैत्री होती. मीनल यांचे 2018 मध्ये कर्करोगाने निधन झाले. आता ललित व सुश्मिता लवकरच लग्‍न करतील असे म्हटले जात आहे. दरम्यान, याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही, असे सुश्मिताचे वडील शुभीर सेन यांनी म्हटले आहे.

Back to top button