shalini and gauri  
Latest

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत व्यक्तिरेखांची झाली अदलाबदल!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : या मालिकेत कथानकानुसार नवनव्या पात्रांची एन्ट्री होत आहे. स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतंमध्ये चक्क व्यक्तिरेखांची अदलाबदल झालीय. साध्याभोळ्या गौरीने धारण केलाय शालिनीचा अवतार तर चलाख शालिनी बनलीय बिचारी गौरी. मालिकेत हा बदल झालाय चिमुकल्या लक्ष्मीच्या सांगण्यावरुन. राजहट्ट आणि बालहट्टापुढे साऱ्यांनाच झुकावं लागतं.

त्यामुळे लक्ष्मीच्या इच्छेखातर शिर्के-पाटील कुटुंबात बदलाचे वारे वाहू लागलेत. खरंतर जयदीपच्या अनुपस्थितीत शालिनीने गौरीचा बराच छळ केला. घराची मालकिण असूनही तिला मोलकरणीसारखी वागणूक दिली. मात्र जयदीप आता जयवंत देशमुख हे नवं रुप घेऊन परत आलाय. शालिनीला धडा शिकवण्यासाठी त्याने आणि लक्ष्मीने मिळून हा अदलाबदलीचा डाव आखलाय. त्यामुळे गौरी झालीय शालिनी आणि शालिनी बनलीय गौरी.

खरंतर, गौरीने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा ही प्रेक्षकांची इच्छा होती. त्यामुळे शालिनीला ती शालिनीच्याच रुपात कशी अद्दल घडवणार ते पाहणं उत्सुकतेचं असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT