shraddha kapoor and shilpa shetty  
Latest

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी जॅकलीननंतर शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूरचं नाव समोर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनेक बॉलीवूड कलाकारांची नावे समोर आली आहेत.  यामध्ये शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूरचं नाव समोर आलं आहे. रिपोर्टनुसार, बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi)ला अनेक महाग गिफ्ट्स मिळाले आहेत.  सुकेश अनेक बॉलीवूड कलाकारांच्या संपर्कात होता. 'ईडी'च्‍या सूत्रांनी सांगितले की, सुकेशचे अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सह अनेक बॉलीवुड कलाकारांसोबत संपर्क आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, चंद्रशेखरने ईडीच्या चौकशीत या बॉलीवूड कलाकारांची नावे घेतली आहेत.

एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करतील. सुकेश याच्‍याबराेबर या कलाकारांचे संबंध आहेत की नाहीत. सुकेशने ईडीला सांगितलं की,  तो श्रद्धा कपूरला २०१५ पासून ओळखतो. इतकचं नाही तर  'एनसीबी'च्या एका प्रकरणात त्याने तिला मदतदेखील केली होती.

रिपोर्टनुसार, सुकेशने हा दावा केला आहे की, तो कार्तिक आर्यनला घेऊन 'कॅप्टन इंडिया' (Captain India) चित्रपट तय़ार करण्याची योजना आखत होता. त्यशिवाय, जेव्हा राज कुंद्रा एक पोर्न रॅकेट प्रकरणी तुरुंगात होता. तेव्हा सुकेशने कुंद्राच्या सुटकेसाठी शिल्पाला संपर्कदेखील केला होता.

जॅकलीन – नोराला मिळाल्या महागड्या कार

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेहीला सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी, अभिनेत्री लीना मारिया पॉलकडून लक्झरी गाड्या, फोन आणि अन्य महाग गिफ्ट मिळाले. ईडीने २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीतील एका कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आलीय.

सुकेशने रॅनबेक्सीचे माजी संस्थापकाला तुरुंगातून बाहेर काढण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या कुटुंबीयांकडून २०० कोटी रुपये घेतले होते. सध्या तो तुरुंगात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेहीला त्याने महागड्या कारसह अनेक गिफ्ट्स दिले होते. पटियाला हाऊस कोर्टाने सुकेश चंद्रशेखर -लीना मारिया पॉल आणि अन्य जणांविरोधात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT