प्रातिनिधिक छायाचित्र. 
Latest

Stock Market Opening Bell : सपाट सुरुवातीनंतर ‘हिरवे सिग्नल’; जाणून घ्या भारतीय स्टॉक मार्केटचा आजचा मूड

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Stock Market Opening Bell : जागतिक बाजारातील संमिश्र संकेंतानंतर आज भारतीय बाजाराची सुरुवात सपाट झाली. मात्र तासाभरातच निफ्टी आणि सेन्सेक्सने चढत्या आलेखाला सुरुवात केली. त्यामुळे सकाळच्या पहिल्या सत्रात भारतीय बाजाराने हिरवे संकेत दिले आहे. निफ्टीने 18250 वर झेप घेतली तर सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला आहे. जाणून घेऊ या भारतीय बाजाराचा आजचा मूड कसा आहे.

Stock Market Opening Bell : जागतिक बाजारातील घडामोडी

जागतिक बाजारात सिंगापूर एक्सचेंज (SGX) वरील निफ्टी फ्युचर्स आजच्या सकाळच्या व्यवहारात 26 अंकांनी किंवा 0.14% कमी होऊन 18,212 वर व्यापार करत होते. आशियाई बाजार हिरव्या रंगात व्यवहार करत होते – हाँगकाँगचा हँग सेंग 0.4% वाढला, चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक 0.41% वर, दक्षिण कोरियाचा KOSPI 0.72% वर चढला आणि जपानचा निक्केई 225 सपाट व्यवहार करत होता. यूएस मार्केटने शुक्रवारचे सत्र लाल रंगात संपवले – डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज (DJIA) 0.33% घसरले, S&P 500 0.14% घसरले आणि टेक-हेवी नॅस्डॅक 0.24% घसरले.

भारतीय बाजाराची सपाट सुरुवात

जागतिक बाजारातील या संमिश्र संकेतानंतर भारतीय बाजार सपाटपणे उघडला. सोमवारी, NSE निफ्टी 50 18,196.25 वर सपाट व्यवहार करत होता आणि BSE सेन्सेक्स 93.68 अंक किंवा 0.15% घसरून 61,636 वर आला. बँक निफ्टी 34.55 अंक किंवा 0.08% घसरून 43,934.85 वर पोहोचला.

Stock Market Opening Bell : सपाट सुरुवातीनंतर हिरवे संकेत

भारतीय बाजाराने सपाट सुरुवात केली असली तरी थोड्याच वेळात बाजाराने गती पकडली आणि बाजारात तेजी दिसून आली. निफ्टीने 18200 च्या वर झेप घेतली, सेन्सेक्स 70 अंकांनी वाढला; मात्र, बँक निफ्टी 43960 च्या खाली व्यवहार करत आहे.
त्यानंतर बाजाराचा मूड हिरव्या संकेतांच्या दिशेने बदलताना दिसून आला. निफ्टीने 18250 च्या वर झेप घेतली, सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला; बँक निफ्टी देखील ४३९७० च्या वर आला. त्यामुळे भारतीय बाजारात सकाळचे सत्र हिरव्या रंगातच व्यवहार करतील असे संकेत आहेत.

Stock Market Opening Bell : झोमॅटोचे शेअर्स 1 टक्क्यांनी वाढले

भारतीय बाजारात आज झोमॅटोचे शेअर्स वाढलेले दिसत आहे. झोमॅटोचे शेअर्स 1 टक्क्यांनी वाढले आहे.

Stock Market Opening Bell : सकाळच्या सत्रातील टॉप गेनर्स अँड लूझर्स

निफ्टी 50 वर अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, बजाज ऑटो आणि पॉवर ग्रिड हे सर्वाधिक वाढले तर एशियन पेंट्स, हिंदाल्को, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांना नुकसान झाले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT