पुढारी ऑनलाईन डेस्क
राज्यातील कृषी महाविद्यालये वगळता सर्व महाविद्यालयांचे वर्ग, सर्व विद्यापीठे आणि वसतीगृहे १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. या काळात ऑनलाईन वर्ग सुरु राहतील. तर सर्व विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होतील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेवून महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
गोंडवाना, नांदेड, जळगाव विद्यापीठांत इंटरनेट जोडणीची अडचण आहेत. असल्याने स्थानिक परिस्थिती पाहून ऑफलाइन परीक्षा घ्याव्यात. दहावीच्या चित्रकला परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. कॉलेज, विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीसाठी हेल्पलाइन सुरू कराव्यात, अशी सूचनाही यावेळी सामंत यांनी केली. १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व विद्यापीठे वसतीगृहेही बंद होणार आहेत. परदेशी विद्यार्थ्यांची सर्व काळजी घेऊन वसतीगृहात राहू शकतात, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यातील कृषी महाविद्यालये वगळता सर्व महाविद्यालयांचे वर्ग, सर्व विद्यापीठे वसतीगृहे १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. मात्र या कालवधीत ऑनलाईन वर्ग सुरु राहणार आहेत. जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही तर त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कुलगुरुंनी निर्णय घ्यावा, असेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचलं का?