पंतप्रधान मोदी म्हणाले, “तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा, मी जिवंत भटिंडा विमानतळावर पोहोचू शकलो” | पुढारी

पंतप्रधान मोदी म्हणाले, "तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा, मी जिवंत भटिंडा विमानतळावर पोहोचू शकलो"

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पंजाबमधील रॅली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी त्रूटी राहिल्याने रद्द करण्यात आली. कारण, आंदोलकांनी ताफा अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना १५ ते २० मिनिटं उड्डाण पुलावर थांबावं लागलं. मोदींच्या दौऱ्याची कल्पना असताना आणि राज्य सरकारने मोदींच्या सरक्षणाची हमी दिली असतानाही, त्यात घोडचूक झाल्याने भाजपकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर या घटनेबाबत पंतप्रधान मोदी यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकारावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया समोर आलेली असून पंतप्रधान मोदी यांनी म्हंटलं आहे की, “तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो”, अशी प्रतिक्रिया मोदींनी विमानतळावरील कर्मचाऱ्यांशी बोलताना दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे प्रचारसभा होणार होता. त्यामुळे ते भटिंडा येथे पोहोचले. तेथून ते  हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे जाणार होते. परंतु, पाऊस आणि खराब वातावरण यामुळे पंतप्रधानांना हवामान स्वच्छ होण्याची वाट पाहावी लागली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने रस्त्याने ते राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचा निर्यण घेतला.

आता हा प्रवास २ तासांचा होता. अशात गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी करण्यात आली. पंतप्रधान रस्ता मार्गाने  प्रवासासाठी निघाले. राष्ट्रीय स्मारकापासून केवळ ३० किलोमीटर पंतप्रधानांचा ताफा आला असताना त्या उड्डाणपुलावर काही आंदोलकांनी रस्ता अडविला. त्यामुळे पंतप्रधानांना पुन्हा २० मिनिटं थांबावे लागले.

यावर गृहमंत्रालयाने सांगितले की, “या सुरक्षेतील त्रुटींनंतर पंतप्रधान मोदींचा ताफा भटिंडा विमानतळावर परत आणण्यात आला. सुरक्षेतील या गंभीर त्रुटीची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. या गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, असेही राज्य सरकारला सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे मोदींची फिरोजपूर रॅली रद्द करण्यात आली आहे.”

हेही वाचलं का? 

Back to top button