पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचा २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी विधिमंडळात सादर केला जाणार आहे. तर, २७ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. (State budget) विद्यमान उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचा पहिलावहिला अर्थसंकल्प असणार आहे. वाचा सविस्तर बातमी.
९ मार्च रोजी वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ८ मार्च रोजी राज्य़ाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाणार आहे. जुन २०२२ मध्ये सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पाकडे सर्वांच लक्ष लागून राहीले आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
हेही वाचा