ऑनलाईन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मचे प्रमोशन
दुबईमध्ये खरेदी केली संपत्ती
कोण आहे अनुराग द्विवेदी
Youtuber Anurag Dwivedi ED Raid: उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील युट्यूबर आणि क्रिकेट विश्लेषक अनुराग द्विवेदीच्या वडिलोपार्जित घरात आणि त्याचे काका नपेंद्र नाथ द्विवेदी यांच्या घरावर इडीने धाड टाकली होती. इडीची ही प्रक्रिया पूर्ण झालं असून इडीने या घरातून चार वाहने देखील जप्त केली आहेत. यात अनुराग द्विवेदीची लक्झरी कार लॅम्बॉर्गिनीचा देखील समावेश आहे. त्याने ही गाडी गुन्हेगारी कृत्यातून कमवलेल्या पैशातून घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अनुरागचे धोनीसोबत देखील फोटो आहेत. तसेच तो अनेक प्रसिद्ध पॉडकास्टमध्ये देखील दिसला आहे.
अनुरागच्या घरातून जप्त केलेल्या गांड्यामध्ये ४.१८ कोटी रूपयांची लॅम्बॉर्गिनी उरूस, मर्सिडीस बेंझ, एक फोर्ड एन्डेव्हर आणि थार गाडीचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अनुरागवर फसवणूक, घोटाळा आणि अवैध ऑनलाईन सट्टेबाजीचे आरोप आहेत. त्याच अनुशंगाने त्याच्या घरांवर इडीची छापेमारी झाली आहे. तो डिजीटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक ऑनलाईन सट्टा आणि जुगार नेटवर्क चालवत होता.
इडीने दिलेल्या माहितीनुसार, तपासत सिलीगुडीमधील एक ऑनलाईन सट्टेबाजी पॅनल ओपरेट होत होतं. त्यात सोनू कुमार ठाकूर आणि विशाल भारद्वाद याच्यासह अजून आरोपी सामील होते. ही टोळी बोगस बँक खाते टेलिग्रीम चॅनल आणि इतर डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर करून देशातील विविध भागात अवैध ऑनलाईन सट्टेबाजी आणि जुगारासंबंधी कृत्य करत होते. तपासात युट्यूबर अनुराग द्विवेदीची भूमिका देखील समोर आली आहे.
इडीच्या म्हणण्यानुसार अनुराग द्विवेदीने अवैध ऑनलाईन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मला चालना देण्यासाठी सक्रीय भूमिका बजावली होती. इडीने दावा केला आहे की द्विवेदीने या प्लॅटफॉर्मचा प्रचार करण्यासाठी व्हिडिओ तयार केला आणि तो शेअर केला. त्या बदल्यात त्याला हवाला ऑपरेटरकडून म्यूल खात्यात आणि मध्यस्थाच्या मदतीनं कॅश देण्यात आली. तपासात अनुरागच्या कुटुंबियांच्या खात्यात देखील या अकाऊंटवरून मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाले आहेत. या व्यवहाराच्या मागे कोणताही वैध आधार सापडलेला नाही.
इडीने अनुरागने अवैध सट्टेबाजीच्या वेबसाईटच्या प्रमोशनमधून मिळवलेल्या पैशातून दुबईत संपत्ती खरेदी केल्याचा देखील दावा केला आहे. इडीच्या माहितीनुसार, अनुराग सध्या दुबईतच असून त्याला अनेकवेळा नोटीस देऊन देखील पाठवण्यात आली होती. मात्र तो इडीसमोर हजर झाला नाही.
त्यानंतर इडीने पुढची कारवाई करत १७ डिसेंबर रोजी लखनौ आणि उन्नावमधील अनुराग द्विवेदीच्या संबंधित नऊ ठिकाणी छापेमारी केली. यात इडीला अनेक संशयास्पद पुरावे मिळाले आहेत. यात दुबईतील गुंतवणूकीबाबतचे कागदपत्रे, डीजिटल सामुग्री समाविष्ट आहे. इडीच्या म्हणण्यानुसार या पुराव्यावरून दिसून येते की अनुरागने हवाला चॅनलच्या माध्यमातून दुबईत रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे.
२६ वर्षीय अनुराग द्विवेदी हा एक सर्वसाधारण युवक वाटत असला तरी त्याची लाईफ स्टाईल फिल्मी आहे. अनुराग उन्नाव जिल्ह्यातील अजनैग पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतोय. त्याचा हळू हळू ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडे रस वाढत गेला. त्याने क्रिकेटशी संदर्भात प्रॉडक्शन आणि विश्लेषण करण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुरू केला. ड्रीम ११ आणि इतर ऑनलाईन क्रिकेट प्लॅटफॉर्मशी संबंधित कंटेटद्वारे त्याने चांगले फॉलोअर्स कमवले.