पुढारी वृत्तसेवा
आजच्या डिजिटल युगात डेटिंग ॲप्स तरुण पिढीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत.
पण या ॲप्सवर स्वतःची ओळख अधिक प्रभावीपणे सादर करण्याच्या प्रयत्नात एक नवा ट्रेंड उदयास आला आहे, ज्याला ‘बायो-बेटिंग’ असे म्हटले जात आहे.
काय आहे ‘बायो-बेटिंग’?
बायो-बेटिंग म्हणजे डेटिंग ॲप्सवरील आपल्या बायोमध्ये स्वतःबद्दलच्या माहितीला आकर्षक पद्धतीने सादर करणे.
हा ट्रेंड वेगळा आहे. कारण यात तुम्ही खोटे बोलत नाही, तर सत्य गोष्टींचा अतिशयोक्ती करून सांगता.
उदाहरणार्थ: तुम्ही एकदाच ट्रेकिंगला गेला असाल, पण बायोमध्ये ‘आउटडोअर ॲडव्हेंचर लवर’ लिहिता.
ॲपच्या ॲल्गोरिदममध्ये मजेदार, उत्साही आणि ॲडव्हेंचरस वाटणाऱ्या प्रोफाइल्सना प्राधान्य मिळते. त्यामुळे गर्दीत वेगळे दिसण्यासाठी लोक स्वतःला अधिक चांगल्या पद्धतीने सादर करतात.
एका रिलेशनशिप कोचच्या मते, वेगळे दिसणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे लोक प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, याचा नकारात्मक परिणाम डेटिंगच्या अनुभवावर होत आहे.
एका सर्वेक्षणानुसार, तब्बल ६३% लोक प्रत्यक्षात भेटल्यानंतर निराश झाल्याचे सांगतात.
बायोमधील मोठी आश्वासने आणि प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तीमधील फरक लोकांना एक प्रकारची फसवणूक वाटू शकते.
बायो-बेटिंग ही अशी गोष्ट आहे जी आपण सर्वांनी कधी ना कधी केली आहे. पण एका चांगल्या आणि खऱ्या नात्याची सुरुवात परिपूर्ण बायोने नाही, तर प्रामाणिक बायोने होते.
जर तुमचा खरा छंद घरी बसून आराम करणे असेल, तर Avid Hiker असे लिहिणे टाळा. कारण, खरा स्वाइप तुम्हाला तुमच्या प्रामाणिक व्यक्तिमत्त्वानेच मिळेल.