Waqar Younis pudhari
स्पोर्ट्स

Waqar Younis Video: सचिन की इंझमाम... सचिन! विराट की बाबर... विराट! वकार युनिसच्या 'रॅपिड यॉर्कर'वर पाक क्रिकेटच क्लीन बोल्ड

नुकतेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वकार युनिस शुंभकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये आला होता त्यावेळी त्याने पाकिस्तानी खेळाडूंपेक्षा भारतीय क्रिकेटपटूंचीच नावे जास्त घेतली.

Anirudha Sankpal

Waqar Younis Video: क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वैर सध्या जास्तच वाढलं आहे. दोन्ही देशांमधील लष्करी संघर्षानंतर अर्थात ऑपरेशन सिंदूर नंतर खेळाडूंनी हस्तांदोलनही करणं सोडून दिलं आहे. मात्र असं असलं तरी पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे भारतीय क्रिकेटपटूंबद्दल असलेलं ममत्व हे काही कमी झालेलं नाही.

नुकतेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वकार युनिस शुंभकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये आला होता त्यावेळी त्याने पाकिस्तानी खेळाडूंपेक्षा भारतीय क्रिकेटपटूंचीच नावे जास्त घेतली. सहाजिकच आहे कारण भारताने गेल्या दोन दशकात क्रिकेट जगतात आपल्या क्षमतेच्या जोरावर दबदबा निर्माण केला आहे.

रॅपिड फायरमध्ये टाकले अनपेक्षित यॉर्कर

शुभंकर मिश्रा यांनी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाला रॅपिड फायरमध्ये अडचणीचे प्रश्न विचारले. मात्र वकार युनिसने उलटे यॉर्कर टाकत धडाधड उत्तरे दिली. ही उत्तरे ऐकून सर्वांनाच धक्का बसेल. कारण वकाने पाकिस्तानी खेळाडूंऐवजी भारतीय खेळाडूंना जास्त महत्व दिलं आहे. त्यामुळे पाकिस्तानात या व्हिडिओमुळे वादंग देखील निर्माण होऊ शकते.

भारतीय खेळाडूंचा भरणा

शुभंकर मिश्राने जर तुमच्या टीममध्ये कोणत्यातरी एका खेळाडूला जागा द्यायची असेल तर असा प्रश्न विचारला. शुभंकर यांनी पहिलीच चॉईस ही सचिन तेंडुलकर आणि इंझमाम उल हक यांची दिली होती. त्यावर क्षणाचाही विलंब न करत वकारने सचिन तेंडुलकरचे नाव घेतलं. तोच कित्ता त्याने विराट कोहली आणि बाबर आझम यांच्या पर्यायाबाबत गिरवला. त्याने त्वरित विराट कोहलीचे नाव घेतले.

बुमराहचा देखील समावेश

यानंतर विरेंद्र सेहवाग आणि सईद अन्वर यांच्यापैकी कोणाला संघात स्थान देणार त्यावर वकारने सईद अन्वरचे नाव घेतले. त्यानंतर मॅच फिनिशर म्हणून जावेद मियांदाद ऐवजी एमएस धोनीची निवड केली. मात्र कपिल देव आणि इम्रान खान यांच्यातील एकाची निवड करताना त्याने आपला कर्णधार इम्रान खानची निवड केली. तसेच त्याने आपल्या संघात शाहीन ऐवजी बुमराला स्थान देत एक प्रकारे भारतीय संघ दोन्ही डिपार्टमेंटमध्ये सध्या जगात भारी असल्याचे संकेत दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT