Virat Kohli Centuries: विराट कोहलीने त्याचे 53 वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ही कामगिरी केली. हे विराटचे 84वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 99 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. कोहलीने सलग तिसऱ्या सामन्यात 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत आणि हे त्याचे सलग दुसरे शतक आहे.
विराट कोहली हा जगातील पहिला क्रिकेटपटू आहे ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन डावांमध्ये सलग 11 वेळा शतके झळकावली आहेत. सलग एकदिवसीय सामन्यांमध्ये शतके ठोकण्याच्या यादीत विराटनंतर एबी डिव्हिलियर्सचा क्रमांक लागतो, ज्याने असे सहा वेळा केले आहे. कोहलीने सचिन तेंडुलकरचा एकाच स्थानावर (Position) खेळून सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विश्वविक्रमही मोडला.
रांचीतील मालिकेच्या पहिल्या सामन्यातील 135 धावांच्या अप्रतिम इनिंगनंतर हे सलग दुसरे शतक आहे. शतक पूर्ण होताच कोहलीने हेल्मेट काढून आकाशाकडे हात उंचावले. केएल राहुल धावत येऊन त्याला मिठी मारण्यासाठी तर उत्साही होता. "कोहली, कोहली"च्या घोषणांनी मैदान दणाणून गेले होते.
या शतकासह कोहलीने आता चार वेगवेगळ्या संघांविरुद्ध सात किंवा त्यापेक्षा जास्त शतके झळकावली आहेत — श्रीलंका (10), वेस्ट इंडीज (9), ऑस्ट्रेलिया (8) आणि दक्षिण आफ्रिका (7). असा पराक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. एक दिवस आधीच कोहलीने विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचं जाहीर केलं. त्याआधी ऋतुराज गायकवाडनेही शानदार 105 धावा ठोकल्या होत्या.