स्पोर्ट्स

Sri lanka Team ODI Tri Series : भारत, द. आफ्रिकेविरुद्धच्या तिरंगी मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, 3 नव्या खेळाडूंना संधी

27 एप्रिलपासून तिरंगी एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.

रणजित गायकवाड

Sri lanka announced Team for ODI Tri Series

कोलंबो : भारत, द. आफ्रिका आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघांमध्ये 27 एप्रिलपासून एकदिवसीय तिरंगी मालिका खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पहिला सामना यजमान श्रीलंका आणि भारत यांच्यात कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. या तिरंगी मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेने त्यांचे संघ जाहीर केले आहेत. आता यजमान श्रीलंकेने बुधवारी (दि. 23) त्यांच्या संघाची 17 सदस्यीय घोषणा केली.

चमारी अटापट्टू कर्णधार

श्रीलंका संघाचे नेतृत्व अनुभवी अष्टपैलू चमारी अटापट्टू हिच्याकडे सोपवण्यात आले आहे. संघात तीन नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये मालकी मदारा, देवसी विहांगा आणि पिउमी बदालगे यांचा समावेश आहे. ही मालिका 27 एप्रिल ते 11 मे दरम्यान कोलंबोमध्ये खेळवली जाईल. मालिकेतील सर्व सामने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहेत.

‘या’ खेळाडूंना ना वगळले

याव्यतिरिक्त, न्यूझीलंड दौऱ्यावर खेळलेल्या वनडे मालिकेच्या तुलनेत एकूण सहा मोठे बदल करण्यात आले आहेत. या संघात इनोका रणवीरा, हसीनी परेरा आणि हंसिमा करुणारत्ने यांचा समावेश करण्यात आला आहे. तर इमेशा दुलानी, साचिनी निसानाला, कौशानी नुथ्यांगा, चेथाना विमुक्ती आणि दुखापतग्रस्त उदीशका प्रबोधनी यांना संघातून वगळण्यात आले आहे.

वनडे तिरंगी मालिकेसाठी श्रीलंका महिला संघ :

चमारी अटापट्टू (कर्णधार), हर्षिता समरविक्रम, विश्मी गुणरत्ने, नीलाक्षिका सिल्वा, कविशा दिलहारी, अनुश्का संजीवनी (यष्टीरक्षक), मनुदी नानायकारा, हसीनी परेरा, अचिनी कुलसूरिया, पिउमी बदालगे, देवसी विहांगा, हंसिमा करुणारत्ने, मालकी मदारा, इनोशी प्रियदर्शनी, सुगंधिका कुमारी, रश्मिका सेवेवंडी, इनोका रणवीरा.

वनडे तिरंगी मालिकेचे वेळापत्रक (सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता)

  • श्रीलंका विरुद्ध भारत : 27 एप्रिल (कोलंबो, आर. प्रेमदासा स्टेडियम)

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 29 एप्रिल (कोलंबो, आर. प्रेमदासा स्टेडियम)

  • श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 1 मे (कोलंबो, आर. प्रेमदासा स्टेडियम)

  • श्रीलंका विरुद्ध भारत : 4 मे (कोलंबो, आर. प्रेमदासा स्टेडियम)

  • दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत : 7 मे (कोलंबो, आर. प्रेमदासा स्टेडियम)

  • श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 9 मे (कोलंबो, आर. प्रेमदासा स्टेडियम)

  • अंतिम सामना : 11 मे (कोलंबो, आर. प्रेमदासा स्टेडियम)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT