Ravi Shastri warn gautam gambhir ajit agarkar:
भारताचे माजी प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री यांनी भारताचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर टीका करणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. या दोन महान खेळाडूंशी पंगा घेऊ नका असं रवी शास्त्री बोलले. एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्यावर त्यांनी हे वक्तव्य केलं.
रवी शास्त्री यांच्या मते जर या दोघांनी योग्य पद्धतीनं उत्तर द्यायला सुरूवात केली तर जे लोकं त्यांच्या विरूद्ध बोलत आहेत ते त्वरित बाजूला जातील. ते कुठं दिसणार देखील नाहीत. रवी शास्त्री यांनी कोणाचं नाव घेतलं नाही मात्र त्यांचा इशारा बहुदा भारतीय संघाचे सध्याचा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्याकडे होता.
रवी शास्त्री यांच्या या वक्तव्याची टायमिंग एकदम परफेक्ट आहे. विराट कोहलीनं सलग दुसरं शतक ठोकलं होतं. अन् रोहित शर्मा देखील फॉर्ममध्ये आला होता. शास्त्री यांचे हे वक्तव्य आगामी २०२७ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये विराट अन् रोहितची काय भूमिका असेल याबाबत चर्चा सुरू असताना आलं आहे.
शास्त्रींनी रोहित आणि कोहली यांच्या कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना इशारा दिला. शास्त्रींचा विराट कोहलीसोबत खास बाँडिग आहे. रवी शास्त्री यांनी प्रभात खबरशी बोलताना सांगितलं की, 'विराट कोहली आणि रोहित शर्मा हे वनडे क्रिकेटचे महान क्रिकेटपटू आहेत. या स्तरावरील खेळाडूंशी पंगा घेऊ नये.
शास्त्री पुढे म्हणाले, 'काही लोकं हे जे सर्व करत आहेत. मी त्यांना फक्त इतकंच सांगू इच्छितो की जर हे दोन्ही खेळाडूंनी योग्य पद्धतीनं हे प्रकरण पुढं नेलं. योग्य बटन दाबलं तर जे लोक यांच्यासोबत हा खेळ करत आहेत ते लवकरच गायब होतील. अशा खेळाडूंसोबत मस्ती करू नका यार..!'
यावर मुलाखतकाराने या खेळाडूंसोबत कोण मस्ती करत आहे असा प्रश्न विचारला. यावर शास्त्री यांनी स्पष्ट उत्तर न देता करणारी करत आहेत. मात्र या दोघांचे डोके ताळ्यावर आलं अन् त्यांनी बटन दाबला तर सगळे बाजूला जातील.'