Rohit Sharma: दुसऱ्या सामन्यात १४ धावांवर बाद होणाऱ्या रोहित शर्मानं घेतला मोठा निर्णय; मुंबईच्या संघात परतणार

सलामीवीर रोहित शर्माला फारशी चमक दाखवता आली नाही. तो १४ धावा करून बाद झाला.
Rohit Sharma
Rohit SharmaPudhari Photo
Published on
Updated on

Rohit Sharma SMAT: भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना काल रायपूरमध्ये झाला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेनं भारतावर ४ विकेट्सनी विजय मिळवत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. दुसऱ्या वनडे सामन्यात भारताकडून विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांनी शतकी खेळी केली. मात्र सलामीवीर रोहित शर्माला फारशी चमक दाखवता आली नाही. तो १४ धावा करून बाद झाला.

Rohit Sharma
Virat Kohli: किंग आता थांबणार नाही, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावले 84वे शतक; सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला

मुंबईच्या संघात परतणार?

रोहित शर्मा दुसऱ्या वनडे सामन्यानंतर एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. रोहित शर्मा मुंबईच्या संघात परतण्याच्या तयारीत आहे. जरी रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो सईद मुश्ताक अली ट्रॉफी खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

रोहित शर्मा सध्या दक्षिण अफ्रिकेविरूद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळत आहे. ही मालिका येत्या शनिवारी संपुष्टात येईल. त्यानंतर रोहित शर्मा १२ ते १८ डिसेंबर दरम्यान इंदौरमध्ये होणाऱ्या सईद मुश्ताक अली ट्रॉफीच्या बाद फेरीत खेळण्याची शक्यता आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma : फक्त १४ धावा करूनही ‘हिटमॅन’ रोहित शर्माने रचला इतिहास; द्रविडला टाकले मागे

MCA कडे व्यक्त केली इच्छा

मुंबईच्या संघानं सईद मुश्ताक अली ट्रॉफीत लीग स्टेजमधील आतापर्यंतचे चारही सामने जिंकले आहेत. ते सध्या एलिट ग्रुप A मध्ये १६ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. ही स्पर्धा लखनौ इथं होत आहे. मुंबई बाद फेरीत पोहचण्याची चांगली शक्यता आहे.

रोहितच्या खेळण्याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील सूत्रांनी सांगितलं की, 'रोहित शर्माने सईद मुश्ताक अली ट्रॉफीची बाद फेरी मुंबईकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.'

Rohit Sharma
Rohit Sharma ODI Sixer King : रोहित शर्मा बनला ODIचा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा विक्रम काढला मोडीत

यापूर्वी बीसीसीआयने भारतीय संघातील सर्व खेळाडूंना आंतररराष्ट्रीय स्पर्धा खेळत नसताना किंवा दुखापतग्रस्त नसताना देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्याची सक्ती केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news