Rashid Khan Indian Citizenship pudhari
स्पोर्ट्स

Rashid Khan Indian Citizenship : तू इथं राहू शकतोस, भारताकडून खेळू शकतोस... राशीदला कोणी दिली होती Indian Citizenship ची ऑफर

Anirudha Sankpal

Rashid Khan Indian Citizenship News: अफगाणिस्तानचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू राशिद खान सध्या आयपीएल खेळत आहे. गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या राशिद खानने अशी कोणती धमाकेदार कामगिरी केलेली नाही. मात्र तरी देखील तो सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. राशिद खानचे एक पुस्तक रिलीज होणार होणार आहे. या पुस्तकाचं नाव 'राशिद खान : फ्रॉम स्ट्रीट टू स्टारडम' असं आहे. या पुस्तकात त्याने भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांकडून मला काही वर्षांपूर्वी त्यांच्या देशाकडून खेळण्याची ऑफर मिळाली होती असा गौप्यस्फोट केला आहे.

राशिद खान आपल्या पुस्तकात लिहितो की, २०२३ च्या आयपीएल हंगामात माझ्याशी देशाचं नागरिकत्व बदलण्यासाठी अप्रत्यक्ष संपर्क करण्यात आला होता. तो आपल्या पुस्तकात याबाबत सविस्तर लिहितो. हे पुस्तक लवकरच रिलीज होणार आहे. या पुस्तकात राशिदने एका जुन्या घटनेचा संदर्भ दिला आहे. त्यात तो बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माझ्याशी संपर्क केला होता. त्याने अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा हवाला देत मला भारतीय नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव दिला होता.

राशिद म्हणतो, 'मला ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही देशांकडून नागरिकत्वाची ऑफर मिळाली होती. त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो की, जर मी माझ्या देशासाठी क्रिकेट खेळू शकत नसेल तर मी दुसऱ्या कोणत्याही देशाकडूनही क्रिकेट खेळणार नाही.'

राशिद बीसीसीआय अधिकाऱ्याबद्दल बोलताना पुढे म्हणाला, 'मी त्या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेलो होते. आम्ही बोलत असताना त्यांनी तुमच्या देशातील स्थिती अत्यंत खराब आहे. तू भारतात ये. इथं आम्ही तुला भारतीय नागरिकत्व देऊ, तून इथं रहा क्रिकेट खेळ.'

मला ही ऑफर ऐकून धक्का आश्चर्य वाटलं. याला कशी प्रतिक्रिया द्यावी हे सुचलं नाही. मी त्यांना म्हणालो की, मला आश्चर्य वाटलं मला काय उत्तर द्यावं हे कळत नाहीये. मत्र मी हसलो आणि आभारी आहे मी माझ्या देशाकडून खेळतोय. तो देश आहे अफगाणिस्तान.'

राशिदने ऑस्ट्रेलियातील कोणी त्याला नागरिकत्वाची ऑफर दिली होती याबाबत मात्र स्पष्ट अशी माहिती पुस्तकात दिलेली नाही.

राशिद खानची यंदाच्या आयपीएलमधील सुरूवात संथ होती. मात्र आता तो फॉर्ममध्ये आला असून त्याने आतापर्यंत गुजरात टायटन्सकडून खेळताना २० षटकात १५४ धावा देत ६ विकेट्स घेतल्या आहेत. गुजरातला ज्यावेळी गरज होती त्यावेळी राशिद खानने चांगली कामगिरी केली आहे. ते आपला सलग तिसरा सामना जिंकण्याच्या तयारीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT