PV Sindhu Asian Games Controversy pudhari
स्पोर्ट्स

PV Sindhu Asian Games Controversy: 18 तासात 3 सामने, व्हिडिओ रिव्ह्यू नाही... एशियन गेम्स आयोजक जपान सिंधूसोबत वाईट वागलं?

पीव्ही सिंधूला एशियन्स गेममधील आपला पदकांचा दुष्काळ संपवता आला नसला तरी तिने नव्या जोमाने पुनरागमन करण्याचा मानस बोलून दाखवला आहे.

Anirudha Sankpal

PV Sindhu Asian Games Controversy: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने एशियन गेम्स आयोजकांवर स्पर्धेचे वेळापत्रक आणि व्हिडिओ रिव्ह्यूची कमतरता यावरून टीका केली आहे. बॅडमिंटन सिंगलच्या क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या चेन युफेईने सिंधूचा पराभव केला. त्यानंतर सिंधूने तिच्या शेड्युलवरून टीका केली आहे. २४ तासात सिंधूला तीन सामने खेळावे लागले होते. तिला रिकव्हरीसाठी खूप कमी वेळ मिळाला होता. त्याचा सिंधूच्या कामगिरीवर परिणाम झाला.

विशेष म्हणजे सामन्यावेळी व्हिडिओ रेफरलची देखील सोय नसल्याने पीव्ही सिंधूची निराशा झाली होती. जरी पीव्ही सिंधूच्या पराभवानंतर तिचे एशियन गेम्समधील आव्हान संपुष्टात आले असून तिला तिचा पदकांचा दुष्काळ देखील संपवता आलेला नाही. तरी देखील सिंधूने आपल्या १२ वर्षाच्या प्रवासाचा अभिमान असल्याचं सांगितलं. तिने आपल्या खेळात अजून सुधारणा करून पुढे देखील खेळ सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

पीव्ही सिंधूने सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणजे की, 'माझ्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी मला थोडा वेळ लागला. एशियन गेम्समधील माझे आव्हान आता संपले आहे आणि मला खूप दुःख होत आहे. उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवण्यापासून मी अवघ्या तीन गुणांवर होते. मी सतत त्या तीन गुणांचाच विचार करत आहे. चीनप्रमाणेच, अत्यंत महत्त्वाच्या क्षणी झालेल्या लांब आणि थकवणाऱ्या रॅलीजमुळे सामन्याचे चित्र बदलले. माझ्याकडे विजयाची संधी होती, पण ती हातातून निसटून गेल्याचे दुःख होत आहे.'

जपानमध्ये आयोजित एशियन गेम्सच्या शेड्युलवरून देखील सिंधूने टिका केली. ती म्हणाली, '१८ तासांत मला तीन सामने खेळावे लागले. रात्री ३ वाजता परतले आणि सकाळी ८.३० वाजता पुन्हा सामन्यासाठी बाहेर पडले. याचा शरीरावर नक्कीच परिणाम झाला. पण, तयारी चांगली झाल्यामुळे मला यापेक्षा खूप जास्त अपेक्षा होत्या. मी आणि माझी टीम आता त्या शेवटच्या क्षणांवर काम करत आहोत. आम्ही नक्कीच सुधारणा करू.'

सिंधूने मला पराभवाचे दुःख होत आहे याचा अर्थ मझ्या दृष्टीने खेळ अत्यंत महत्वाचा आहे असे म्हणत पुढे अजून जोमाने लढण्याची मनिषा बोलून दाखवली. ती म्हणाली, 'मला दुःख होत आहे, पण ते ठीक आहे. मला आनंद आहे की या पराभवाचे मला इतके दुःख होत आहे, याचा अर्थ हा खेळ माझ्यासाठी अजूनही महत्त्वाचा आहे. मला अजूनही जिंकायचे आहे. कोर्टवर मी आजही माझा शंभर टक्के जीव ओतते. हीच भावना मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते.'

'दुःखासोबतच मला अभिमानही वाटत आहे. २०१४ मधील माझ्या पहिल्या एशियन गेम्सपासून ते आताच्या चौथ्या गेम्सपर्यंत, १२ वर्षे मी भारतासाठी सर्वस्व दिले आहे. मला या प्रवासाचा अभिमान वाटू द्यायचा आहे. एक वेदनादायी निकाल माझ्या इतक्या वर्षांच्या तपश्च्येला ठरवू शकत नाही.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT