

PV Sindhu On Virat Kohli Relation: गेल्या काही वर्षापासून बॅडमिंटन कोर्टवर म्हणावी तशी कामगिरी न करू शकलेल्या पीव्ही सिंधूला अखेर सुरू गवसला असून तिने आता आफल्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यास सुरूवात केली आहे. नुकतेच पीव्ही सिंधूने क्रिकेटपटू विराट कोहलीबाबतच्या आपल्या खास नात्याबाबत उलगडा केला. तिने विराट हा आपल्या भावासारखा असून त्याने मी ज्यावेळी निराश होते त्यावेळी एक सल्ला दिला होता असं सांगितलं.
आरसीबी पॉडकास्टमध्ये बोलताना दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारी पीव्ही सिंधू म्हणाली की मी ज्यावेळी बॅडमिंटन कोर्टवर संघर्ष करत होते त्यावेळी विराट कोहलीला भेटले होते. मी त्याला सध्या काहीही घडत नाहीये असं सांगितलं. त्यावेळी विराट कोहलीने कोणतेही क्लिष्ट उत्तर दिलं नाही. त्याने एकच विनंती केली की काहीही झालं तरी तू सामना खेळायचं साडू नकोस. तू सराव सोडू नकोस तिथं तू तुझा नैसर्गिक खेळ करत रहा.'
सिंधू पुढे म्हणाली, 'विराट हा माझ्या भावासारखा आहे. ज्यावेळी मी खूप निराश होते त्यावेळी त्याला भेटले. त्यावेळी त्याने सांगितलं की तू फक्त काहीही चुकवू नको. तू फक्त कोर्टवर उपस्थित रहा असा सल्ला दिला होता.'
'त्याने फक्त तू मैदानावर जा आणि तुझा गेम खेळ असं सांगितलं होतं. तू काहीही गमावणार नाहीयेस, तुला माहिती आहे की तू काय आहेस, तू कसा सराव करतेस, जगाला दाखवून दे की तू कोण आहेस. हा संदेश मला भावला. मला वाटतं हे संभाषण माझ्यासाठी महत्वाचं ठरलं अन् मी माझा दृष्टीकोणच बदलला.'
सिंधू म्हणाते की आम्ही दोघे अजूनही टचमध्ये असतो. सिंधू सांगते की, 'ज्या ज्यावेळी मी जिंकते मी माझा आनंद त्याच्यासोबत वाटून घेते. मी आज हे जिंकले ते जिंकले हे सांगत असते. मी नुकतेच त्याला भेटले होते. त्याला भेटणे नेहमीच चांगले असते. त्याने खूप काही मिळवलं आहे. त्यातील काही इनपूट्स तो शेअर करतो. तो मैदानावर असताना जसा विचार करतो. तो ज्या प्रकारे अजूनही पॅशिनेटली खेळतो. मला वाटते की त्याने जे काही मिळवलं आहे त्याबद्दल त्याला मानायलं हवं.'