Prithvi Shaw pudhari Photo
स्पोर्ट्स

IPL Auction 2026 Prithvi Shaw: अनसोल्ड पृथ्वीची तुटलेल्या ह्रदयाची पोस्ट... क्षणातच का केली डिलीट?

पृथ्वी शॉबाबत झालं आहे ते त्यानं जड मनानं मान्य केलं आहे असं वाटत होतं. मात्र मिनिटात त्याचं नशीब पालटलं.

Anirudha Sankpal

IPL 2026 Auction Prithvi Shaw Delhi Capitals: आयपीएल २०२६ च्या लिलावात पृथ्वी शॉची बेस प्राईस ही ७५ लाख रूपये होती. सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणारा अन् आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे सतत चर्चेत असणाऱ्या पृथ्वी शॉला मुख्य लिलावावेळी कोणी खरेदी केलं नाही. तो मुख्य लिलाव राऊंड्समध्ये अनसोल्डच राहिला होता. त्यानंतर त्यानं सोशल मीडियावर ब्रोकन हार्टची इमोजी शेअर करत 'It’s OK.' अशी पोस्ट केली होती.

या पोस्टनंतर जे काही आयपीएल लिलावात पृथ्वी शॉबाबत झालं आहे ते त्यानं जड मनानं मान्य केलं आहे असं वाटत होतं. मात्र मिनिटात त्याचं नशीब पालटलं. जुन्या फ्रेंचायजाने त्याला हात दिला. एक्सलरेशन राऊंडमध्ये दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉला बेस प्राईसमध्ये आपल्या संघात सामील करून घेतलं.

पृथ्वी बॅक टू फॅमिली

विशेष म्हणजे २०१८ ते २०२४ पर्यंत पृथ्वी शॉ हा दिल्ली कॅपिटल्सकडूनच खेळत होता. आता तो पुन्हा दिल्ली कॅपिटल्सकडेच गेला आहे. या घडामोडीनंतर पृथ्वी शॉने आपली तुटक्या ह्रदयाची पोस्ट त्वरित हटवली अन् आनंदानं डीसी वेलकम ग्राफिक शेअर करत 'Back to my family.' अशी पोस्ट केली.

२६ वर्षाचा पृथ्वी शॉ हा सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असून त्याने रणजी ट्रॉफीमध्ये इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान द्विशतक ठोकले. पृथ्वी शॉने १४१ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केलं. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात (प्लेट ग्रुपचे सामने सोडले तर) हे दुसरे सर्वात वेगवान द्विशतक ठरले. यापूर्वी रवी शास्त्री यांनी १९८४ - ८५ च्या हंगामात बडोद्याविरूद्ध १२३ चेंडूत द्विशतक ठोकलं होतं.

सर्फराज खानचेही नशीब उघडले

भारताकडून खेळलेला सर्फराज खानसाठी देखील यंदाचा आयपीएल लिलाव फारसा चांगला नव्हता. तो देखील मुख्य राऊंडमध्ये अनसोल्ड राहिला होता. विशेष म्हणजे लिलाव सुरू होण्यापूर्वीच सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत २२ चेंडूत ७३ धावांची तुफानी खेळी केली होती.

मात्र हाच सर्फराज मुख्य राऊंडमध्ये अनसोल्ड राहिला होता. अखेर एक्सलरेशन राऊंडमध्ये चेन्नई सुपर किंग्जने त्याला बेस प्राईस ७५ लाखाला आपल्या संघात सामील करून घेतलं. आता सर्फराज हा धोनीसोबत खेळणार असून त्याच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच ठरणार आहे. धोनीच्या टिप्समुळे त्याच्या खेळात अजून सुधारणा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT