रणजित गायकवाड
IPL 2026 चा लिलाव नुकताच अबुधाबी येथे पार पडला. यात विदेशी खेळाडूंवर धनवर्षाव झाला.
ऑस्ट्रेलियाचा तगडा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीन याला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने तब्बल 25.20 कोटी रुपयांची बोली लावत विक्रमी किमतीत आपल्या ताफ्यात सामील केले. ग्रीनची बेस प्राईस फक्त 2 कोटी होती.
IPL 2024 च्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला KKR ने 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
IPL 2024 मध्ये, त्याने 14 सामन्यांच्या 13 डावांमध्ये 26.11 च्या सरासरीने 17 बळी घेतले होते, पण त्याची इकॉनॉमी रेट 10 हून अधिक (10.61) राहिली.
त्याच हंगामात KKR ने विजेतेपद पटकावले होते आणि अंतिम सामन्यात त्याने फक्त 14 धावा देत 2 महत्त्वाचे बळी घेतले होते.
ऑस्ट्रेलियाचा आणखी एक दमदार खेळाडू पॅट कमिन्स याला IPL 2024 च्या लिलावात सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने 20.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले.
त्या हंगामात त्याला SRH चे कर्णधारपद मिळाले होते आणि त्याच्या नेतृत्वाखाली SRH संघ उपविजेता ठरला होता.
IPL 2023 च्या लिलावात इंग्लंडचा युवा अष्टपैलू सॅम कुरन याला पंजाब किंग्सने (PBKS) विकत घेतले होते. २ कोटी बेस प्राईस असलेल्या कुरनला 18.50 कोटी रुपयांना संघात घेण्यात आले होते.
KKR ने IPL 2026 च्या लिलावात ग्रीननंतर मथीशा पथीराना याच्यावर मोठी बोली लावली. या श्रीलंकन वेगवान गोलंदाजाला KKR ने 18 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची बेस प्राईस 2 कोटी होती.
पथीरानाने आपला पहिला IPL सामना 2022 मध्ये खेळला होता आणि तो यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्स (CSK) संघाचा भाग होता.