स्पोर्ट्स

Mohammed Shami : ‘मुस्लिम असल्याने मला ट्रोल करतात’, मोहम्मद शमीने व्यक्त केली खंत

आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळणे योग्य आहे का?, यावर शमीने महत्त्वपूर्ण उत्तर दिले

पुढारी वृत्तसेवा

mohammed shami trolled for being muslim expresses disappointment

भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अगामी आशिया चषकासाठी निवड न झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआय निवड समितीने भारतीय संघात पाच गोलंदाजांना स्थान दिले असून त्यापैकी तीन वेगवान आहेत. ज्यांचे नेतृत्व जसप्रीत बुमराह करेल. मात्र, शमीला 15 सदस्यीय मुख्य संघात सोडून द्या त्याला राखीव खेळाडूंच्या यादीतही समाविष्ट केलेले नाही.

यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील टी-20 मालिकेद्वारे शमीने तीन वर्षांनंतर या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले होते. याआधी त्याने 2022 च्या टी-20 विश्वचषकात त्याचा शेवटचा सामना खेळला होता. पुनरागमनाच्या पहिल्या सामन्यात (राजकोट) शमीला विकेट मिळाली नाही, मात्र वानखेडे येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने तीन बळी घेतले होते.

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान त्यांना विचारण्यात आले की, आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळणे योग्य आहे का?, यावर त्याने महत्त्वपूर्ण उत्तर दिले.

सरकार आणि मंडळाच्या निर्णयांचे पालन

आशिया कप २०२५ मध्ये भारताला १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे. त्याआधी 'न्यूज २४' वृत्तवाहिनीवर शमीला विचारण्यात आले की, भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायला हवे का? तेव्हा त्याने थेट उत्तर देणे टाळले आणि सांगितले की, ‘मी वादांपासून दूर राहतो. सामन्यांबद्दलचे निर्णय सरकार आणि क्रिकेट नियामक मंडळ (बोर्ड) घेतात. आम्ही त्याचे पालन करतो.’

‘मुस्लिम असल्याने मला ट्रोल करतात’

पाकिस्तानविरुद्ध खेळणे इतर संघांविरुद्ध खेळण्यापेक्षा वेगळे आहे का? किंवा तो एक सामान्य सामना मानला जातो का? असे विचारले असता शमीने, ‘तो अनुभव खरोखरच वेगळा आहे.’ शमीला सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले, 'काही लोक मला मुस्लिम असल्यामुळे लक्ष्य करतात, विशेषतः पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर. पण मला त्याची पर्वा नाही, कारण मी काही यंत्र (मशीन) नाही. चांगले आणि वाईट दिवस येतच राहतील. जेव्हा मी माझ्या देशासाठी खेळतो, तेव्हा माझे लक्ष्य विकेट घेण्यावर आणि विजय मिळवण्यावर असते, सोशल मीडियावर नाही. ट्रोलिंगचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही, कारण मी त्याकडे दुर्लक्ष करतो. ट्रोलिंगचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही, कारण मी त्याकडे दुर्लक्ष करतो.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT