Lionel Messi Controversy pudhari
स्पोर्ट्स

Lionel Messi Controversy: मेस्सी दिसतो तसा नाही, त्याला रेड कार्डच दाखवायला पाहिजे... अल्जेरियाचा स्टार फुटबॉलरवर गंभीर आरोप

Anirudha Sankpal

Lionel Messi Controversy: अल्जेरियाने फिफाकडे तक्रार करून त्यांच्यावर मोठा अन्याय झाल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाने अल्जेरियाचा पराभव केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यानंतर अल्जेरियन फुटबॉल फेडरेशनने तक्रार केली आहे.

फिफाकडे केलेल्या या तक्रारीत अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी अल्जेरियाचा डिफेंडर अईसा मंडीच्या पायवर स्टडने मारत असल्याचा दावा केला आहे. ही घटना सामन्याच्या ३० व्या मिनिटाला घडली होती. मात्र तरी देखील मेस्सीला फिल्ड अंपायर्सनी कार्ड दाखवलं नाही.

फेडरेशनमधील सूत्रांनी एएफपीला सांगितलं की, 'या तक्रारीत मेस्सीच्या चॅलेंजबाबत काळजी व्यक्त करण्यात आली असून त्याला रेड कार्डच दाखवलायला पाहिजे होतं असं सर्वांचे मत आहे. तसेच सामन्यात मेस्सीने दोनवेळा प्रतिस्पर्धी खेळाडूला एल्बो केल. मात्र दोन्हीवेळा त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.'

सूत्रांनी पुढे सांगितलं की 'आम्ही अर्जेंटिनाचा संघ बलाढ्य नाही असं सांगत नाहीये. मात्र अन्याबाबत गप्प बसणे योग्य नाही. सामन्यात अशा काही घटना घडल्या ज्यात व्हाएआरने मध्यस्थी केली नाही.'

या सामन्यात मेस्सीने हॅटट्रिक करून वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक गोल करण्याच्या मिरोस्लोव्ह क्लोस यांच्या १६ गोलच्या विक्रमाशी बरोबरी केली. आता अल्जेरिया सोमवारी जॉर्डनसोबत खेळणार आहे. तसेच २७ जून रोजी त्यांचा सामना ऑस्ट्रिया सोबत होणार आहे. तर अर्जेंटिना सोमवारी डल्लासमध्ये ऑस्ट्रियासोबत भिडणार आहे.

अल्जेरियाला वर्ल्डकप नॉक आऊट स्टेजमध्ये पोहचायचं आहे. ते जर असं करू शकले तर ते इतिहासात दुसऱ्यांदाच वर्ल्डकपच्या नॉकआऊट स्टेजमध्ये पोहचतील. यापूर्वी ते राऊंड ऑफ १६ मध्ये २०१४ मध्ये पोहचले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT