Lionel Messi: फिफा विश्वचषकापूर्वी अर्जेन्टिनाला मोठा धक्का; लिओनेल मेस्सीच्या पायाला दुखापत, चाहत्यांची चिंता वाढली!

अमेरिकेतील 'मेजर लीग सॉकर' मध्ये इंटर मियामी आणि फिलाडेल्फिया युनियन यांच्यातील सामन्यादरम्यान स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या पायाला दुखापत झाली आहे.
Lionel Messi
Lionel MessiFile Photo
Published on
Updated on

Lionel Messi

नवी दिल्ली: अमेरिकेतील 'मेजर लीग सॉकर' मध्ये इंटर मियामी आणि फिलाडेल्फिया युनियन यांच्यातील सामन्यादरम्यान स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या पायाला दुखापत झाली आहे. आगामी फिफा विश्वचषकाचे काऊंटडाऊन सुरू झाले असतानाच, या दुखापतीमुळे विश्वचषकापूर्वी अर्जेन्टिनाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सामन्यात सहसा संपूर्ण वेळ खेळणाऱ्या मेस्सीला ७३ व्या मिनिटाला काहीसा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याने स्वतःहून मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मैदान सोडल्यानंतर तो थेट ड्रेसिंग रूमकडे गेला. दुसऱ्या सत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मैदान निसरडे झाले होते, ज्यामुळे ही दुखापत झाली असावी असा अंदाज आहे. दरम्यान, मेस्सी कोणत्याही वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीशिवाय स्वतः चालत बाहेर गेल्याने ही दुखापत गंभीर नसावी आणि खबरदारीचा उपाय म्हणून त्याला विश्रांती दिली असावी, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

Lionel Messi
FIFA World Cup 2026 : इराणने फिफाला झुकवले! अमेरिकेतील सराव तळ हलवून मेक्सिकोत गाडले तंबू

सामन्यात गोलचा पाऊस; मियामीचा थरारक विजय

या अटीतटीच्या सामन्यात इंटर मियामीने फिलाडेल्फिया युनियनवर ६-४ असा थरारक विजय मिळवला. फिलाडेल्फियाने सुरुवातीलाच २-० अशी आघाडी घेतली होती, मात्र मियामीने जोरदार पुनरागमन केले. पूर्वार्धातच तब्बल ८ गोल नोंदवले गेले, जो 'एमएलएस'मधील एक विक्रम ठरला आहे. मैदान सोडण्यापूर्वी मेस्सीने दोन उत्कृष्ट गोल पास केले, तर लुईस सुआरेझने शानदार हॅट्रिक नोंदवून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. उत्तरार्धात रॉड्रिगो डी पॉलने गोल करत मियामीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह इंटर मियामीने गुणतालिकेत 'ईस्टर्न कॉन्फरन्स'मध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.

१६ जूनला पहिला सामना

अर्जेन्टिनाचा विश्वचषकातील पहिला सामना १६ जून रोजी होणार आहे. "मी पूर्णपणे तंदुरुस्त असेन तरच विश्वचषकात खेळेन," असे मेस्सीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता त्याच्या तंदुरुस्तीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

"मेस्सी माझ्यापेक्षा १० लाख पटीने जास्त लोकप्रिय!"

सामन्यापूर्वी राष्ट्रगीत गाणारा प्रसिद्ध गायक लुईस फोन्सी याने मेस्सीसोबतच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. फोन्सी म्हणाला, "या ऐतिहासिक सामन्याचा भाग असणे आणि मेस्सीसह इतर महान खेळाडूंना इतक्या जवळून पाहणे हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे. मेस्सी माझ्यापेक्षा १० लाख पटीने जास्त लोकप्रिय आहे," अशी मिश्किल टिप्पणीही त्याने केली.

Lionel Messi
Messi Becomes Billionaire : ‘मेस्सी’ बनला अब्जाधीश, ‘रोनाल्डो’नंतर ही कामगिरी करणारा जगातील दुसरा फुटबॉलपटू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news