Sivaramakrishnan Racism pudhari
स्पोर्ट्स

Sivaramakrishnan Racism: सनी 'योग्य' रंगाचा केक आणलास... शिवरामकृष्णन यांनी टीम इंडियातील 'वर्णभेदाचं' पितळ उघडं पाडलं

Anirudha Sankpal

Sivaramakrishnan Team India Racism: भारताचा कधी काळचा गॉड गिफ्टेड फिरकीपटू म्हणून लक्ष्मण शिवरामकृष्णन यांची ख्याती होती. त्यांनी लेग स्पीनर म्हणून भारताची दीर्घकाळ सेवा केली. मात्र ज्या प्रकारे इतर देशाच्या फिरकीपटूंनी नाव कमावलं त्या प्रकारे शिवरामकृष्णन यांना गुणवत्ता असूनही ते करता आलं नाही. यासाठी शिवरामकृष्णन यांनी काही इतर गोष्टी देखील कारणीभूत असल्याचं नुकत्यात एका मुलाखतीत सांगितलं. या इतर गोष्टींमुळे त्यांच्या मानसिकतेवर आघात झाला. याच्या खुणा पुसणं त्यांना शक्य झालं नाही. विशेष करून वर्णभेदाचे आघातातून ते बाहेर येऊ शकले नाहीत.

लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की रंगभेदाचा पहिला सामना हा त्यांना १४ व्या वर्षी बसला. चेपॉकवर शिवरामकृष्णन यांनी नेट बॉलर म्हणून टीम इंडियात प्रवेश मिळवला होता. त्यावेळी चेंजिंग रूममध्ये भारताच्या एका वरिष्ठ खेळाडूने त्यांना त्यांचे शूज साफ करायला सांगितलं होतं.

मात्र शिवरामकृष्णन यांनी मी त्यांच्याकडे पाहून हे माझं काम नाही तुम्ही स्वतःहून करा असं सांगितलं. नंतर त्यांना सांगण्यात आलं की या वरिष्ठ खेळाडूला वाटलं की शिवरामकृष्णन हे ग्राऊंड स्टाफ आहेत. मला त्यावेळी वर्णभेद किवा रंगभेद काय असतो याची कल्पना देखील नव्हती असं शिवरामकृष्णन यांना सांगितलं.

ही एकमेव घटना नाहीये. तामिळनाडू संघाकडून खेळताना एक दिग्गज खेळाडू त्याला कारूपा असं म्हणत होता. ज्यावेळी ते मुंबई, चंदीगड, जालंदर इथल्या ग्राऊंडवर बाऊंड्री लाईनवर खेळत असताना प्रेक्षक कालिया तेरा क्या होगा असं म्हणत डिवचत असायचे असं शिवरामकृष्णन यांनी सांगितलं.

शिवरामकृष्णन यांनी त्यांच्या १७ व्या वाढदिवसाची देखील एक घटना सांगितली. त्यावेळी सुनिल गावसकर यांनी मला सावरलं म्हणून मी केक कापू शकलो असं देखील ते म्हणाले.

शिवरामकृष्णन यांनी सांगितलं की, संघातील एक वरिष्ठ खेळाडू सुनिल गावसकर यांना म्हणाला की, 'अरे सनी तू योग्य रंगाचा केक ऑर्डर केला आहेस. डार्क बॉयसाठी डार्क चॉकलेट केक.' या कमेंटनंतर मला रडूच कोसळलं. मी केक कापण्यास नकार दिला. त्यानंतर सुनिल गावसकरने मला शांत केलं त्यानंतर मी माझे डोळे पुसत केक कापला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT