Kapil Dev On India Vs Pakistan Row pudhari photo
स्पोर्ट्स

Kapil Dev On India Vs Pakistan Row: ..तर पाकिस्तानची एक पिढी संपून जाईल... कपिल देव यांनी दिला इशारा

Anirudha Sankpal

Kapil Dev On India Vs Pakistan Row: टी २० वर्ल्डकप २०२६ अवघ्या काही दिवसांवर आला असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं नवीन नाटक सुरू केलं आहे. त्यांनी १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार घालण्याची भाषा केली असून आयसीसीने त्यांना फटकारलं आहे.

पाकिस्तानच्या या निर्णयानंतर क्रिकेट वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आता भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी देखील या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पाकिस्तानचा हा निर्णय भारतापेक्षा पाकिस्तानलाच जास्त नुकसानदायक आहे. त्यांना भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

पाकिस्तानची ताठर भूमिका

पाकिस्तानने रविवारी भारतात होणाऱ्या टी २० वर्ल्डकपमध्ये ते सहभागी होणार आहेत. मात्र १५ फेब्रुवारी कोलंबोत होणाऱ्या भारताविरूद्धच्या सामन्यावर ते बहिष्कार टाकणार आहेत असे जाहीर केलं. हा निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ घेण्यात आला आहे. आयसीसीने बांगलादेशची भारतातील सामने इतर ठिकाणी हलवण्याची मागणी फेटाळून लावली. त्याचा विरोध म्हणून पाकिस्तान संघ भारतासोबत खेळणार नाहीये.

क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीवर परिणाम

दरम्यान, यावर भारताचे वर्ल्डकप विजेते माजी कर्णधार कपिल देव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी हे प्रकरण राजकीय प्रतिमेपुरतं मर्यादित नाहीये. मात्र या निर्णयामुळं युवा क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीवर थेट परिणाम होणार आहे.

एका पिढाला संपवून टाकाल

कपिल देव म्हणाले, 'जर हा निर्णय खेळाडूंनी घेतला आहे तर ते समोर येऊन हा निर्णय सांगू शकतात. मात्र जर हा निर्णय क्रिकेट बोर्डाच्या सांगण्यावरून घेतला गेला आहे. जर क्रिकेट बोर्ड तुम्ही खेळू नका असं सांगत असेल तर या देशाची प्रतिमा मलीन झाली आहे.' कपिल देव पुढे म्हणाले की, जर सतत पाकिस्तान मागे हटतोय किंवा बहिष्कार करतोय असं झालं तर पाकिस्तान क्रिकेट एकाकी पडले. पाकिस्तानची अवस्था आधीच चांगली दिसत नाहीये. तुम्ही संपूर्ण एका पिढीला संपवून टाकत आहात.

पाकिस्तानच्या या निर्णयामुळं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला अवघड परिस्थितीत टाकलं आहे. भारत - पाकिस्तान सामना हा आयसीसी स्पर्धांचा व्यावसायिक कणा मानला जातो. या सामन्याच्या प्रसारणातून मोठा महसूल ICC ला मिळतो. महसुलाच्या बाबतीत स्पर्धेचे इतर सर्व सामने एकीकडे आणि भारत - पाकिस्तान सामना दुसरीकडे असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT