IPL 2025 Final RCB vs PBKS RCB's player of the match brigade
बंगळुरू: आयपीएल 2025 हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास केवळ विराट कोहली किंवा एका खेळाडूपुरता मर्यादित नव्हता. यंदाच्या हंगामात नऊ वेगवेगळ्या खेळाडूंनी 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार पटकावत संघाच्या अंतिम फेरीतील प्रवेशात मोलाचा वाटा उचलला आहे.
RCB च्या ‘नऊ रणवीरां’नी मिळून उभारलेली ही विजयाची इमारत केवळ आकड्यांची गोष्ट नसून, ती जणू प्रत्येक खेळाडूच्या संघर्ष, शिस्त आणि संघभावनेची प्रेरणादायक कथा आहे.
2017 च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स (MI) व्यतिरिक्त, आयपीएलच्या इतिहासात हे दुसऱ्यांदाच घडले आहे की विजेत्या संघात इतक्या विविध खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली. RCB च्या 'नऊ शूरवीरांनी' यशात नेमके काय योगदान दिले जाणून घेऊया....
14 सामने; 15 बळी; 105 धावा
RCB मध्ये सहभागी होण्यापूर्वी कृणाल पांड्याची एका हंगामातील सर्वोत्तम बळी संख्या होती 12 बळी. जी त्याने 2018 आणि 2019 या दोन्ही वर्षांत घेतले होते. मात्र यंदाच्या हंगामात, फक्त बंगळूरूने बाहेरच्या (अवे) मैदानावर खेळलेल्या सातही जिंकलेल्या सामन्यात त्याने 11 विकेट घेतल्या असून एकूण 15 विकेट घेतल्या आहेत.
डावखुर्या फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करताना त्याने वैविध्य दाखवले आहे. लेंथ्स, उंची (trajectory) आणि धारदार बाऊंसर यांचा प्रभावी वापर करून उत्कृष्ट नियंत्रण त्याने राखलं. यातील सर्वात लक्षवेधी कामगिरी मुंबई इंडियन्सविरुद्ध झाली. जेव्हा त्याने मिशेल सँटनरला चकवून शेवटच्या षटकात केवळ 18 धावांचा बचाव करत तीन विकेटस घेतल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.
2016 नंतरचं त्याचं पहिलं IPL अर्धशतक यंदा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ‘अवे’ सामन्यात आले. हा विजय RCB साठी निर्णायक ठरला.
14 सामने; 286 धावा; SR 142.28
कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच हंगामात रजत पाटीदारने झळकावलेल्या दोन अर्धशतकांनी RCB ला दोन ऐतिहासिक विजय मिळवून दिले. चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध 2008 नंतरचा पहिला विजय आणि वानखेडेवर मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध 2015 नंतरचा पहिल्या विजयाचा त्यात समावेश आहे.
या दोन्ही सामन्यांत त्याने प्रतिस्पर्धी कर्णधारांना फिरकी गोलंदाज थांबवण्यास भाग पाडले. विशेषतः MI विरुद्ध त्याने जसप्रीत बुमराहच्या शेवटच्या षटकांतील दबाव टाळण्यासाठी हार्दिक पांड्यावर हल्ला चढवला आणि 32 चेंडूंमध्ये 64 धावा करत RCB ला 221/5 या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले ही त्याची हंगामातील सर्वोत्तम खेळी ठरली.
14 सामने; 614 धावा; SR 146.53
विराट कोहलीने यंदा आठ अर्धशतके झळकावली आहेत. आणि त्या साऱ्याच RCB च्या विजयांमध्ये ही एक विक्रमी कामगिरी ठरली आहे. यंदाचा त्याचा स्ट्राइक रेट त्याच्या 2016 मधील वेगवान फलंदाजीतील स्ट्राईक रेट 152.03 पासून फार दूर नाही. तेव्हा विराटने ऐतिहासिक 973 धावा फटकावल्या होत्या.
या हंगामात कोहलीने संघासाठी पारंपरिक ‘अँकर’ म्हणून भूमिका न बजावता वरच्या फळीतील आक्रमक ‘वादळ’ म्हणून खेळ केला आहे. ही झंझावाती शैली 2024 च्या दुसऱ्या टप्प्यातील त्याच्या फॉर्मचा एक नैसर्गिक विस्तारच आहे. RCB ने सलग सहा विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. यंदा स्कोअर चेस करताना कोहलीची सरासरी 88.50 अशी जबरदस्त आहे.
12 सामने; 187 धावा; SR 185.14
RCB चं टिम डेविडसाठीचं धोरण स्पष्ट होतं. कमी वेळेत जास्त परिणाम. पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्धच्या एका सामन्यात त्याने 26 चेंडूंमध्ये नाबाद 50 धावा केल्या. हे अर्धशतक RCB ला विजय मिळवून देऊ शकले नाही, पण त्याच्या खेळीने संघाच्या फलंदाजीची खोली दाखवून दिली. ही कामगिरी 'हरलेल्या संघातील खेळाडूला प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाल्याची दुर्मिळ उदाहरणं ठरली.
विशेष म्हणजे, अंतिम सामन्यापूर्वी यंदाच्या हंगामात डेथ ओव्हर्समध्ये टिम डेविडपेक्षा अधिक षटकार फक्त श्रेयस अय्यरने मारले आहेत.
11 सामने; 21 बळी; इकोनॉमी 8.30
हेजलवूडच्या खांद्यातील दुखापतीमुळे चाहत्यांना ‘रोटेटर कफ’सारख्या जखमांबाबत चिंता वाटत होती, पण तीन आठवडे उलटून पहिल्या सामन्यातच हेजलवुडने पंजाब किंग्जविरुद्ध पॉवरप्लेमध्ये जोश इंग्लिस आणि श्रेयस अय्यर यांच्या विकेट घेत RCB ला अंतिम फेरीच्या मार्गावर नेले.
शेवटच्या टप्प्यात त्याचं कौशल्य तितकंच महत्त्वाचं ठरलं, विशेषतः राजस्थान रॉयल्सविरुद्ध 12 चेंडूत 17 धावांचा बचाव करताना त्याने फक्त एकच धावा दिली आणि दोन बळी घेतले. ज्यात ध्रुव जुरेलचा समावेश होता ज्याने अलीकडेच 18व्या षटकात भुवनेश्वर कुमारला 21 धावा फटकावल्या होत्या. या गोलंदाजीच्या जोरावर RCB चा घरच्या मैदानावर तीन सामन्यांचा पराभवाचा क्रम मोडला गेला. जोश हेजललवूड जणू बंगळूरसाठी ‘डेथ ओव्हर्स’चा तज्ज्ञ झाला आहे.
12 सामने; 387 धावा; SR 175.90
सॉल्टने बंगळूर संघात फाफ डु प्लेसिसची सलामीवीराची जागा सहजपणे मिळवली आणि पॉवरप्लेमध्ये प्रभावी भूमिका बजावली आहे. त्याच्या सुरुवातीचा आक्रमक खेळ आरसीबीसाठी प्रभावी ठरला. मिशेल स्टार्कच्या एका ओव्हरमध्ये 30 धावा फटकावल्या गेल्या होत्या, त्यातील 24 सॉल्टच्या होत्या. त्याच्या आक्रमणामुळे विराट कोहलीवरचा बऱ्याचसा दबाव कमी झाला आहे.
सलामीला धावा करण्यात साल्ट आणि कोहली जोडीच्या पुढे केवळ बी. साई सुदर्शन आणि शुभमन गिल ही जोडी आहे. अंतिम फेरीतील खेळाड्यांमध्ये साल्ट आणि प्रियांश आर्य हे पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकारांसाठी (14 षटकार) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या हंगामात RCB साठी त्याने चार अर्धशतक ठोकले आहेत.
14 सामने; 237 धावा; 19 झेल/स्टंपिंग; SR 171.73
जितेश शर्माचा या हंगामातील एकच अर्धशतक त्याचे सर्वात महत्त्वाचे ठरले. कारण ते एका ‘मस्ट-विन’ सामन्यात आले होते. लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध त्याने केवळ 33 चेंडूत नाबाद 85 धावा करून IPL मधील क्रमांक 6 किंवा त्यापुढील स्थानावर केलेला तिसरा सर्वोच्च स्कोर नोंदविला आणि RCB ला त्यांचा सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग साध्य करुन दिला.
हंगामाच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याचा 19 चेंडूत नाबाद 40 धावा करणारा पराक्रमही लक्षवेधी होता, ज्यात त्याने बुमराह आणि ट्रेंट बोल्टवर जोरदार हल्ला चढवला. तसेच, कर्णधार रजत पाटीदार जखमी झाल्यावर त्याने थोडक्यात कर्णधार म्हणूनही काम पाहिले.
13 सामने; 8 बळी; इकोनॉमी 8.81
दोन वर्षांपासून सुयश शर्मा हर्नियाच्या तक्रारीने पीडीत होता. लंडनमध्ये RCB च्या मदतीने त्याच्यावर शस्त्रक्रिया केली गेली आणि हलका, फिट आणि तंदुरुस्त होऊन तो संघासाठी परतला आहे. त्याने केवळ आठ बळी घेतले असले तरीही त्याने संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 18 व्या षटकात केवळ सहा धावा दिल्या आणि 34 धावा 18 चेंडूत हव्या असताना त्यांचा बचाव केला. तसेच क्वालिफायर 1 मध्ये त्याने 3 बळी 17 धावांत घेतले आणि पंजाबची खालची फळी कापून काढली.
कृणाल पांड्या आणि सुयश कागदावर तितके ताकदवान फिरकीपटू वाटत नसले तरी या हंगामात त्यांनी अपेक्षेपेक्षा अधिक परिणामकारक कामगिरी केली आहे.
7 सामने; 53 धावा (SR 353.33); 5 बळी
लिआम लिव्हिंगस्टोनच्या तुलनेत सुरुवातीला दुर्लक्षित झालेला रोमॅरियो शेफर्डने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या महत्त्वाच्या घरगुती सामन्यात संधी साधली. तो 18व्या षटकात मैदानात आला आणि त्याने 14 चेंडूतून 10 बॉल्स चौकारांना पाठवून IPL मधील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले.
त्याच्या या खेळीने RCB ला तणावपूर्ण सामन्यात महत्त्वाचा वेग मिळवून दिला आणि संघाला प्लेऑफच्या जवळ पोहोचण्यास मदत केली. RCB ने शेवटच्या दोन षटकांत केलेल्या 54 धावांपैकी 53 धावा शेफर्डने केल्या आणि अंतिम 12 चेंडूंत या RCB च्या सर्वाधिक धावा आहेत, ज्यापैकी 32 धावा खलील अहमदच्या एका षटकात आल्या होत्या.