

IPL 2025 चा फायनल जवळ येताच रॉयल चॅलेंजर्स बेंगलूर (RCB) विषयी भविष्यवाणी समोर आली आहे. सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित अरुणेश कुमार शर्मा यांच्या मते, यंदाच्या हंगामात RCB संघ विजेता होण्याची जोरदार शक्यता आहे.
RCB ने क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्स (PBKS) ला 8 गडी राखून हरवत IPL 2025 च्या अंतिम सामन्यात आपली जागा निश्चित केली. या सामन्यात RCB ला विजयासाठी केवळ 102 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी आरामात गाठले. आता RCB 1 जून रोजी अहमदाबादमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीत क्वालिफायर-2 ची विजेता टीम यांच्याशी भिडेल.
ज्योतिषाचार्य पंडित अरुणेश कुमार शर्मा यांनी अंकज्योतिषाच्या आधारे IPL 2025 चे विजेते कोण होणार, याचा अंदाज लावला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, RCB साठी अंक 9 हा अत्यंत शुभ आहे.
IPL चा 18 वा हंगाम: अंकज्योतिषात 18 या संख्येचा मूलांक 9 होतो (1+8=9).
विराट कोहलीचा जर्सी नंबर : विराट कोहलीचा जर्सी नंबरही 18 आहे, जो पुन्हा 9 बनतो.
3 जून 2025 चं फायनल : या तारखेचा संख्यात्मक बेरीज केली तर 18 (3+6+2+0+2+5) म्हणजे पुन्हा मूलांक 9.
9 वर्षांनंतर फायनल : RCB तब्बल 9 वर्षांनंतर (2016 नंतर) फायनलमध्ये पोहोचली आहे.
ज्योतिषशास्त्रात मूलांक 9 चा स्वामी मंगळ ग्रह आहे, जो परिश्रम, धैर्य, जोश आणि लढाऊ वृत्तीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या सर्व योगायोगांमुळे 9 नंबर RCB साठी सुफळ संकेतानुसार पुढे येतोय.