

IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जने शानदार विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सला पाच विकेट्स राखून पराभवाची धूळ चारली. या रोमांचक विजयासह त्यांनी अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. आता, पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकण्यासाठी, त्यांना 3 जून रोजी याच मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ला हरवावे लागेल. पंजाबसाठी कर्णधार श्रेयस अय्यरने एक संस्मरणीय खेळी केली. त्याने ४१ चेंडूत नाबाद ८७ धावा करत आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
श्रेयसने त्याच्या नेतृत्वाखाली पंजाबला अंतिम फेरीत पोहोचवून इतिहास रचला. तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचवणारा तो पहिला कर्णधार ठरला. २०२० च्या हंगामात त्याने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व जेतेपदाच्या सामन्यात केले. त्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्लीला मात देऊन करून ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर २०२४ च्या फायनलमध्ये अय्यरने कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व केले. त्यावेळी अंतिम फेरीत केले सनरायझर्स हैदराबादला हरवून केकेआरने जेतेपद जिंकले.
याशिवाय, अय्यर टी-२० क्रिकेटच्या इतिहासात भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. अय्यर आता टी-२० फायनलमध्ये सर्वाधिक संघांचे नेतृत्व करणारा भारतीय कर्णधार बनला आहे.
अहमदाबादमधील हे स्टेडियम आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी भाग्यवान ठरलेले नाही. संघाने येथे सलग सहावा सामना गमावला आहे. या मैदानावर त्यांचा शेवटचा विजय २०१४ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध होता.
याशिवाय, श्रेयस अय्यर प्लेऑफमध्ये तीन वेळा ५०+ धावा करणारा पहिला आयपीएल कर्णधार बनला आहे. यापूर्वी २०२० मध्ये त्याने दुबईमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ६५ धावांची नाबाद खेळी केली होती.
नाबाद ६५ (५० चेंडू) विरुद्ध एमआय, दुबई २०२०
नाबाद ५८ (२४) विरुद्ध एसआरएच, अहमदाबाद २०२४
नाबाद ८१ (४०) विरुद्ध एमआय, अहमदाबाद २०२५
अय्यरहा आयपीएल हंगामात पंजाबकडून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. या हंगामात अय्यरने ३९ षटकार मारून चमत्कार केला आहे. यापूर्वी पंजाब किंग्जकडून हा विक्रम ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर होता. २०१३ च्या हंगामात ग्लेन मॅक्सवेलने ३६ षटकार मारले होते.
३९* - श्रेयस अय्यर, २०२५
३६ - ग्लेन मॅक्सवेल, २०१३
३४ - ख्रिस गेल, २०१९
३४ - लियाम लिव्हिंगस्टोन, २०२२
३२ - केएल राहुल, २०१८
- स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने मुंबईविरुद्ध २०० किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य गाठले आहे. यापूर्वी मुंबई संघाने २००+ धावा करून १८ वेळा विजय मिळवला होता. त्यांना पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे.
- पंजाब किंग्जने २०४ धावांचे लक्ष्य गाठून एक खास विक्रम नोंदवला. आयपीएल प्लेऑफ किंवा नॉकआउटमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.
- पंजाबने आयपीएलमध्ये आठव्यांदा २००+ धावांचे लक्ष्य गाठले आहे. अशी कामगिरी करणारा हा पहिला संघ आहे.
- आयपीएल २०२५च्या हंगामात एखाद्या संघाने २००+ धावांचे लक्ष्य गाठण्याची ही नववी वेळ आहे. एकाच आयपीएल हंगामात हे पहिल्यांदाच घडले आहे.
पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक झाल्यानंतर लगेचच पाऊस पडला आणि सामना २ तास १५ मिनिटे उशिराने सुरू झाला. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या ४४-४४ धावांच्या खेळीमुळे मुंबईने २० षटकांत ६ गडी बाद २०३ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबने १९ षटकांत ५ गडी बाद २०७ धावा करत सामना जिंकला.