स्पोर्ट्स

IND vs PAK : १४ डिसेंबरला भारत-पाकिस्तान महामुकाबला..! दुबईत रंगणार क्रिकेटचा थरार

अंडर-१९ आशिया कप २०२५ : १२ डिसेंबरपासून स्पर्धेला सुरुवात, आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात

रणजित गायकवाड

ind vs pak cricket match u19 asia cup 2025 dubai

दुबई : आगामी अंडर-१९ आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात मोठी आणि बहुप्रतिक्षित बातमी म्हणजे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धचा हाय-व्होल्टेज सामना कोणत्या दिवशी होणार, हे निश्चित झाले आहे.

युवा कर्णधार आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेमध्ये विजेतेपदासाठी आपले आव्हान सादर करण्यास सज्ज झाला आहे. यामध्ये वैभव सूर्यवंशी आणि इतर युवा खेळाडू आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी उत्सुक आहेत.

भारत-पाकिस्तान 'महामुकाबला' कधी?

या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघांना गट 'अ' मध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यातील द्वंद्व निश्चित झाले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेला भारत-पाकिस्तान अंडर-१९ सामना १४ डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे हा सामना रविवारी असल्याने क्रिकेट चाहत्यांना एक मोठी क्रिकेट मेजवानी मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार सर्व सामने सकाळी १०.३० वाजता सुरू होतील. त्यापूर्वी १०.०० वाजता टॉस होईल.

टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज)

युवा टीम इंडियाला ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने खेळायचे आहेत.

  • १२ डिसेंबर २०२५ : विरुद्ध युएई

  • १४ डिसेंबर २०२५ : विरुद्ध पाकिस्तान

  • १६ डिसेंबर २०२५ : विरुद्ध मलेशिया

स्पर्धेचे स्वरूप आणि गट रचना

यंदाच्या आशिया कपचे यजमानपद दुबईकडे आहे. स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत आहेत, ज्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.

  • ग्रुप 'अ' : भारत, पाकिस्तान, युएई, मलेशिया

  • ग्रुप 'ब' : अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ

प्रत्येक संघ आपल्या गटातील संघांशी एक-एक सामना खेळेल. दोन्ही गटांमधून अव्वल दोन संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी विजेतेपदासाठी अंतिम सामना खेळला जाईल.

अंडर-19 आशिया कपसाठी भारतीय संघ

आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी (फलंदाज), वेदांत त्रिवेदी (फलंदाज), युवराज गोहिल (फलंदाज), डी दीपेश (फलंदाज), अभिज्ञान कुंडू (यष्टिरक्षक), हरवंश सिंह (यष्टिरक्षक), कनिष्क चौहान (अष्टपैलू), खिलान पटेल (अष्टपैलू), नमन पुष्पक (अष्टपैलू), हेनिल पटेल (गोलंदाज), किशन कुमार सिंह (गोलंदाज), उधव मोहन (गोलंदाज), आरोन जॉर्ज (गोलंदाज)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT