पुढारी वृत्तसेवा
भारतीय संघाचा युवा फिरकीपटू कुलदीप यादव याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा आणि महत्त्वाचा विक्रम आपल्या नावावर केला.
एकाच सामन्यात सर्वाधिक वेळा ४ बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत त्याने थेट तिसरे स्थान गाठले आहे.
विशेष म्हणजे, त्याने महान गोलंदाज अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ यांच्यासारख्या दिग्गजांना मागे टाकले.
कुलदीपने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिस-या आणि शेवटच्या वनडे सामन्यात ही शानदार कामगिरी केली.
या सामन्यात कुलदीपने आपल्या मनगटी फिरकीची जादू दाखवली. त्याने १० षटकांच्या स्पेलमध्ये केवळ ४१ धावा देत ४ महत्त्वाचे बळी घेतले.
ही त्याच्या कारकिर्दीतील १२ वी वेळ आहे, जेव्हा त्याने वनडेमध्ये ४ किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. या कामगिरीसह, त्याने अजित अगरकरच्या विक्रमाशी बरोबरी केली.
मोहम्मद शमी : १०८ सामने : १६ वेळा
अजित अगरकर : १९१ सामने : १२ वेळा
कुलदीप यादव : ११७ सामने : १२ वेळा
अनिल कुंबळे : २७१ सामने : १० वेळा
जवागल श्रीनाथ : २२९ सामने : १० वेळा
रवींद्र जडेजा : २०७ सामने : ९ वेळा