IND vs RSA Pudhari Photo
स्पोर्ट्स

IND vs RSA: २५ वर्षात झालं नाही ते टीम इंडिया करून दाखवणार; धावांचा नाही तर षटकांचा डोंगर पेलणार?

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी आज टीम इंडियासमोर मोठं आव्हान असणार आहे.

Anirudha Sankpal

India Vs South Africa 2nd Test Day 5:

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी आज टीम इंडियासमोर मोठं आव्हान असणार आहे. दक्षिण अफ्रिकेनं भारतासमोर विजयासाठी ५४८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताची चौथ्या दिवसअखेर २ बाद २७ धावा अशी अवस्था झाली होती.

टीम इंडिया इथून सामना जिंकण्याची शक्यता खूप कमी आहे. टीम इंडियाला पाचव्या दिवशी जवळपास १०० षटके खेळून काढणंही कठीण जाणार आहे. गेल्या २५ वर्षात जे झालं नाही ते पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला करायचं आहे. जर गुवाहाटीमध्ये टीम इंडिया अशी कामगिरी केली तर ही कामगिरी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल.

आज टीम इंडिया २ बाद २७ धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात करेल. जर टीम इंडियाला मालिका बरोबरीत सोडवायची असेल तर त्यांना सामना जिंकावा लागले. मात्र क्रिकेटच्या इतिहासात एवढं मोठं टार्गेट पाचव्या दिवशी कधी चेस झालेलं नाही.

2008 मध्ये खेळली होती सर्वाधिक षटके

टीम इंडियाला पाचव्या दिवशी जवळपास १०६ षटके खेळून काढायची आहेत. यापूर्वी भारतानं २००० मध्ये म्हणजे २५ वर्षापूर्वी पासूनचा कसोटी इतिहास काढला तर टीम इंडियानं २००८ मध्ये चौथ्या डावात सर्वाधिक षटके खेळून काढली होती. त्यावळी टीम इंडियाने इंग्लंडविरूद्ध चेन्नईत चौथ्या डावात ९८.३ षटके खेळून काढली होती. हा सामना टीम इंडियानं जिंकला होता. तर २००१ मध्ये इंग्लंडविरूद्धच अहमदाबादमध्ये टीम इंडियानं ९७ षटके खेळून काढत सामना ड्रॉ केला होता.

चौथ्या डावात इतिहास रचणार?

२००५ मध्ये पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाने ९० षटके खेळून काढली होती. मात्र टीम इंडिया हा सामना हरला होता. २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध ८७.४ षटके खेळून देखील सामना हरला होता. टीम इंडियाने २०११ मध्ये वेस्ट इंडीजविरूद्धच्या कसोटी सामन्यात चौथ्या डावात ८०.४ षटके खेळून काढत सामना जिंकला होता. आज टीम इंडियाला १०६ षटके तग धरायचा आहे.

चौथ्या डावात चेस करून मिळवलेला सर्वात मोठा विजय

  • २००३ - वेस्ट इंडीज विरूद्ध ऑस्ट्रेलिया - ४१८ धावा

  • २००८ - दक्षिण अफ्रिका विरूद्ध ऑस्ट्रेलिया - ४१४ धावा

  • १९४८ - ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड - ४०४ धावा

  • १९७६ - भारत विरूद्ध वेस्ट इंडीज - ४०३ धावा

  • २०२१ - वेस्ट इंडीज विरूद्ध बांगलादेश - ३९५ धावा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT