India vs Pakistan Asia Cup match September 14
संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध भारतीय संघाचा दणदणीत विजय पाहिल्यानंतर आता पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्याची प्रतीक्षा आहे. १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या महासंग्रामासाठी भारतीय संघाच्या संभाव्य अंतिम ११ खेळाडूंबद्दल मोठे संकेत मिळाले आहेत, ज्यामुळे संघात कोणते खेळाडू असतील याचा अंदाज येतो. या हायव्होलटेज सामन्यासाठी भारतीय संघाची रचन ५ फलंदाज, ३ अष्टपैलू खेळाडू आणि ३ गोलंदाज अशी असण्याची शक्यता आहे.
आता प्रश्न असा आहे की पाकिस्तानविरुद्धच्या भारतीय संघात कोणते चेहरे असतील? तर, याचे उत्तर माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा यांच्या बोलण्यातून मिळते. त्यांच्या मते, UAE विरुद्ध जो संघ खेळला होता, तोच संघ पाकिस्तानविरुद्धही खेळताना दिसेल. म्हणजेच, संघात कोणताही बदल होणार नाही. अजय जडेजा यांनी हे विधान UAE विरुद्ध भारताचा सामना सुरू होण्यापूर्वी आशिया कपच्या प्रक्षेपण वाहिनी 'सोनी नेटवर्क'च्या माध्यमातून केले होते.
UAE विरुद्ध भारताच्या अंतिम ११ खेळाडूंवर चर्चा करताना अजय जडेजा म्हणाले होते की, भारताने UAE विरुद्ध ८ फलंदाजांना खेळवू नये होते. पण जर तसे केले असेल, तर पाकिस्तानविरुद्ध जो संघ खेळणार आहे, तो तुम्ही आजच पाहिला आहे. म्हणजेच, UAE विरुद्ध खेळलेला संघच पाकिस्तानविरुद्धही खेळणार आहे.
जर UAE विरुद्धचाच भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार असेल चित्र स्पष्ट आहे. हा संघ खालील प्रमाणे असेल....
फलंदाज : शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक)
अष्टपैलू खेळाडू : हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल
गोलंदाज : कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह