IND Vs AFG India Playing 11 pudhari
स्पोर्ट्स

IND Vs AFG India Playing 11: सॅमसन IN वैभव OUT... अफगाणिस्तानविरूद्ध अनुभवीच टॉप ऑर्डर; माजी खेळाडूनं स्पष्टच सांगितलं

Anirudha Sankpal

India Vs Afghanistan 1st T20I India Playing 11: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन ३ टी २० सामन्यांची मालिका सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी भारताची प्लेईंग ११ काय असेल विशेष करून भारताची टॉप ऑर्डर काय असणार आहे याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. १५ वर्षाचा वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेविरूद्ध चांगली कामगिरी करत प्लेईंग ११ मधील आपली दावेदारी मजबूत केली आहे. मात्र असं असलं तरी भारताचा माजी कर्णधार आणि सलामीवीर अजिंक्य रहाणे मात्र वैभवला टॉप ३ बॅटरमध्ये स्थान देण्यास तयार नाहीये.

काय म्हणाला अजिंक्य?

अजिंक्य रहाणेने आपल्या युट्यूब चॅनलवर स्पष्टपणे सांगितलं की आयसीसी मेन्स टी२० वर्ल्डकप खेळणारे टॉप ३ फलंदाज त्यांच्यासोबतच आपण पुढं गेलं पाहिजे. त्यांच्या मते आता टीमच्या फलंदाजीसोबत प्रयोग करण्याची गरज नाही. रहाणेच्या मते अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि इशान किशन हे टॉप ३ फलंदाज असले पाहिजेत.

अजिंक्य रहाणे म्हणाला की, 'मला असं वाटतं टॉप ३ मध्ये तेच फलंदाज असले पाहिजेत जे वर्ल्डकप खेळणार आहेत.' संजू सॅमसनबाबत बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला, संजू सॅसमनने संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. काही खराब सामन्यानंतर त्याला बाहेरचा रस्ता दाखवणे योग्य नाही. संजू सॅमसनला अजून एक संधी मिळायला हवी.

संजू सॅमसनला अजून एक संधी मिळावी

अजिंक्य म्हणाला की, संजू सॅमसनने चांगली कामगिरी केली आहे. मात्र त्याला दोन किंवा तीन खराब सामन्यानंतर बाहेर बसवण्यात आलं आहे. मला असं वाटतं की त्याला अजून एक संधी मिळायला हवी. अभिषेक आणि इशान किशन यांनी देखील संघासाठी चांगली कामगिरी केली आहे.

वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेविरूद्धच्या टी २० मालिकेत दोन अर्धशतकी खेळी केल्या आहेत. तो प्लेअर ऑफ द सीरिज देखील झाला होता. त्यानंतरच तो अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेत देखील टॉप ३ फलंदाजांमध्ये सामील असेल अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र अजिंक्यच्या मते वैभवकडे अजून भरपूर वेळ आहे. त्याला गडबडीत कोणत्याही एस्टॅब्लिश खेळाडूच्या जागी स्थान दिलं जाऊ नये.

वैभवची देखील वेळ येईल

अजिंक्य म्हणाला की, वैभवला त्याची संधी मिळेल. त्याची देखील वेळ येईल. मात्र सध्याच्या घडीला मला वाटतं की टॉप ३ मध्ये संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन असायला हवेत.

वैभव सूर्यवंशीने जुलै महिन्यात इंग्लंडविरूद्धच्या सामन्यातून आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे. आता तो संघातील आपली जागा पक्की करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे. वैभवच्या पदार्पणामुळे आता संजू सॅमसनसाठी टॉप ऑर्डरमध्ये स्पर्धा वाढली आहे.

भारतीय प्लेईंग ११ यातून निवडणार

भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा. वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, वरूण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, नीतीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, यश ठाकूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT