स्पोर्ट्स

IND vs SA : शुभमन गिलचे भारतीय संघात होणार ‘कमबॅक’..! द. आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार

Team India : गिलच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

रणजित गायकवाड

टीम इंडियाचा (Team India) युवा तडफदार फलंदाज तसेच एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) याच्या चाहत्यांसाठी एक नवी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. मानेच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेबाहेर असलेला हा स्टार खेळाडू ९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत पुनरागमन करणार का, याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

फिटनेस अपडेट : बंगळूरुच्या 'NCA' मध्ये रिहॅबसाठी दाखल

गिलच्या दुखापतीसंदर्भात मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, तो आता बंगळूरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रिहॅबसाठी दाखल झाला आहे. याचा अर्थ तो आपल्या फिटनेसवर काम करत आहे आणि मैदानात परतण्यासाठी सज्ज होत आहे.

'५० टक्क्यांहून अधिक शक्यता', पण...

'क्रिकबझ'च्या वृत्तानुसार, शुभमन गिल ९ डिसेंबरच्या आधी पूर्णपणे खेळण्यासाठी फिट होण्याची शक्यता ५० टक्क्यांहून अधिक आहे. मात्र, तो १०० टक्के फिट असल्याशिवाय त्याला सामन्यांसाठी संघात स्थान मिळणार नाही, अशीही माहिती मिळत आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार असलेल्या गिलच्या फिटनेस रिपोर्टची टीम मॅनेजमेंट उत्सुकतेने वाट पाहत आहे.

स्क्वॉड कधी होणार जाहीर?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. या मालिकेसाठी गिलला संघात संधी मिळते की नाही, हे पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी आतुर आहेत. स्क्वॉड जाहीर झाल्यावरच या चर्चांवर पूर्णपणे पडदा पडेल आणि चित्र स्पष्ट होईल.

भारत-दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला टी-२० : ९ डिसेंबर : कटक : सायंकाळी ७ वाजल्यापासून

  • दुसरा टी-२० : ११ डिसेंबर : चंदीगड : सायंकाळी ७ वाजल्यापासून

  • तिसरा टी-२० : १४ डिसेंबर : धर्मशाला : सायंकाळी ७ वाजल्यापासून

  • चौथा टी-२० : १७ डिसेंबर : लखनऊ : सायंकाळी ७ वाजल्यापासून

  • पाचवा टी-२० : १९ डिसेंबर : अहमदाबाद : सायंकाळी ७ वाजल्यापासून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT