मुंबई : भारत आणि पाकिस्तान जेव्हा क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने येतात, तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष या महामुकाबल्याकडे लागलेले असते. मात्र, क्रिकेटच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच चाहत्यांना एकाच दिवशी भारत-पाक लढतीचा दुहेरी थरार अनुभवायला मिळणार आहे. येत्या महिन्याच्या अर्थात फेब्रुवारीच्या १५ तारखेला भारत आणि पाकिस्तानचे संघ दोन वेगवेगळ्या स्पर्धेत एकमेकांशी भिडणार आहेत.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा बिगुल ७ फेब्रुवारीपासून वाजणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ही स्पर्धा खेळवली जाणार असून, १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानचे पुरुष संघ आमनेसामने येतील. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.
१५ फेब्रुवारीला केवळ पुरुष संघच नाही, तर भारत आणि पाकिस्तानचे महिला संघही एकमेकांचे आव्हान स्वीकारतील. थायलंडची राजधानी बँकॉक येथे 'आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार, भारत-अ आणि पाकिस्तान-अ या महिला संघांमधील सामना १५ फेब्रुवारीलाच खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही सामन्यांच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने चाहत्यांना एकाच दिवशी या दोन्ही सामन्यांचा मनमुराव आनंद घेता येईल.
महिलांच्या 'रायझिंग स्टार्स' आशिया चषकात एकूण ८ संघांचा समावेश असून त्यांची विभागणी दोन गटांत करण्यात आली आहे.
गट अ: भारत-अ, पाकिस्तान-अ, युएई आणि नेपाळ.
गट ब: बांगलादेश-अ, श्रीलंका-अ, मलेशिया आणि यजमान थायलंड.
१३ फेब्रुवारी : पाकिस्तान-अ विरुद्ध नेपाळ : सकाळी ८:३०
१३ फेब्रुवारी : भारत-अ विरुद्ध युएई : दुपारी १२:३०
१४ फेब्रुवारी : मलेशिया विरुद्ध थायलंड : सकाळी ८:३०
१४ फेब्रुवारी : बांगलादेश-अ विरुद्ध श्रीलंका-अ : दुपारी १२:३०
१५ फेब्रुवारी : युएई विरुद्ध नेपाळ : सकाळी ८:३०
१५ फेब्रुवारी : भारत-अ विरुद्ध पाकिस्तान-अ : दुपारी १२:३०
१६ फेब्रुवारी : श्रीलंका-अ विरुद्ध मलेशिया : सकाळी ८:३०
१६ फेब्रुवारी : बांगलादेश-अ विरुद्ध थायलंड : दुपारी १२:३०
१७ फेब्रुवारी : भारत-अ विरुद्ध नेपाळ : सकाळी ८:३०
१७ फेब्रुवारी : पाकिस्तान-अ विरुद्ध युएई : दुपारी १२:३०
१८ फेब्रुवारी : बांगलादेश-अ विरुद्ध मलेशिया : सकाळी ८:३०
१८ फेब्रुवारी : श्रीलंका-अ विरुद्ध थायलंड : दुपारी १२:३०
२० फेब्रुवारी : उपांत्य फेरी १ व २ : स. ८:३० आणि दु. १२:३०
२२ फेब्रुवारी : अंतिम सामना : दुपारी १२:३०