Auqib Nabi NZ vs IND ODI Series: न्यूझीलंड विरूद्धची टी २० मालिका संपल्यानंतर ५ सामन्यांची वनडे मालिका सुरू होत आहे. यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. निवडसमितीने आकिब नबी या वेगवान गोलंदाजाला टीम इंडियात सामील केलं आहे. यापूर्वी आकिबला मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी निवड केली होती. मात्र आता तो पूर्ण मालिका संघात असणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपल्या संघाबाबतच्या नव्या घडामोडींची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी वेगवान गोलंदाज आकिब नबीची यापूर्वी शेवटच्या दोन वनडे सामन्यांसाठी निवड करण्यात आली होती. मात्र आता तो पहिल्या तीन वनडे सामन्यासाठी देखील संघात असेल असे सांगितलं.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्धच्या तीन वनडे सामन्यात खेळणार आहे. यात रोहित शर्मा, विराट कोहली सोबतच श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि अक्षर पटेल या खेळाडूंचा समावेश आहे. वेगवान गोलंदाजीत अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज गुरूनूर बरार आणि आता आकिब नबी यांचा समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या वनडे सामन्यासाठी नीतीश कुमार रेड्डी देखील संघात असून बीसीसीआयच्या अपडेटनुसार तो फक्त पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा झाली त्यात नबीचा समावेश होता. या सामन्यात श्रेयस अय्यर कर्णधार होता. तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांना देखील संधी मिळाली आहे. पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी शुभमन गिल कर्णधार असणार आहे. चौथ्या आणि पाचव्या वनडेत ही जबाबदारी श्रेयस अय्यर सांभाळणार आहे.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल, अक्षर पटेल, नमन धरी, अंशुल कंबोज, गुरनूर बरार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, इशान किशन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, नीतीश कुमार रेड्डी, आकिब नबी.
श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, इशान किशन (उपकर्णधार), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर बरार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंगं, कुमार कुशाग्र, मोहम्मद सिराज, यश ठाकूर, कुलदीप यादव.
पहिला वनडे: ४ नोव्हेंबर, बुधवार - इडन पार्क, ऑकलंड.
दुसरा वनडे: ७ नोव्हेंबर, शनिवार - हेनरी (Hnry) स्टेडियम, वेलिंग्टन.
तिसरा वनडे: १० नोव्हेंबर, मंगळवार - सेडन पार्क, हॅमिल्टन.
चौथा वनडे: १३ नोव्हेंबर, शुक्रवार - बे ओव्हल, माऊंट माउंगानुई.
पाचवा वनडे: १५ नोव्हेंबर, रविवार - बे ओव्हल, माऊंट माउंगानुई.
सामन्याची वेळ: सर्व सामने भारतीय वेळेनुसार (IST) सकाळी ७:३० वाजता सुरू होतील.